बसपा चा आज आक्रोश मोर्चा
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी: – तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, जो सकार निकम्मी है,वो सरकार बदलनी है या घोषणांनी बहुजन समाज पार्टी चा आक्रोश मोर्चा येथील इंदोरा मैदानावरुन काढण्यात आला.बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधिमंडळावर प्रदेशाध्यक्ष अॅड संदीपज ताजने यांच्या नेतृत्वात आज 23 डिसेंबर रोजी या भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे .या मोर्चात महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी अॅड. सुनील डोंगरे, प्रशांत इंगळे, हुलगेश चलवादी, मनीष कावळे तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आप-आपल्या कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हा मोर्चा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती, महापुरुषांची स्मारके, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, अनुसूचित जाती-जमाती, श्रमिक, विद्यार्थी, युवा, बेरोजगार, शिक्षण, आरोग्य, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी त्याशिवाय स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, यशवंत स्टेडियम शेजारच्या पटवर्धन मैदानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक व आंतरराष्ट्रीय शोध केंद्र बांधावे, अंबाझरी उद्यान शेजारी 20 एकड जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी करावी, मान्यवर कांशीराम टी पॉइंट व कांशीराम मार्गाला कांशीराम मेट्रो स्टेशनचे नाव द्यावे, रहाटे कॉलनी चौकाला दीक्षाभूमी चे नाव, वर्धमान नगरातील स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेट्रो स्टेशन नाव, मुंबईच्या दादर येथील इंदू मिलच्या जागेवर विनाविलंब डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनवावे, भूमीहीनांना गायरान वन, झुडपी च्या शासकीय जमिनी मिळाव्या, बेघरांना घर मिळावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, अतिवृष्टीचे पैसे मिळावे, आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, पीक विमा योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ, भीमा कोरेगाव दंगलीतील निरपराधांवरील गुन्हे रद्द करा, गुन्हेगारावर गुन्हे दाखल करा, ॲट्रॉसिटीच्या केसेस मधील दिरंगाई बंद करा, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती द्या, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा, एससी, एसटी, ओबीसी च्या नोकरीतील अनुशेष पूर्ण करा, दलित वस्ती व शिष्यवृत्ती मधील शासकीय भ्रष्टाचाराची चौकशी करा, अंगणवाडी सेविकांना न्याय, ग्रामीण मधील शिक्षण व आरोग्य ह्याकडे विशेष लक्ष द्या, SC/ST/OBC ना केजी ते पीजी पर्यंतचे सर्व शिक्षण मोफत द्या, सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सोई द्या, जनतेतून थेट सरपंच- नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया रद्द करा, महापुरुषांचा अवमान करणारे राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राजनेत्यावर कार्यवाही करण्याचा कायदा बनवावा. शिवाजी पार्क दादर येथील पोलीस अधिकारी सतीश कसबे, मनोज पाटील, कासार यांचेवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावे, आदी 37 मागण्या घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले. नागपुरातील मोर्चाला यशस्वी करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, विधानसभा कार्यकारिणी तसेच आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.मोर्चाची माहिती व्हावी या हेतूने ठिकठिकाणी राज्यातील भिंती निळ्या केलेल्या आहेत. पोस्टर, पॉम्पलेट घरोघरी पोहोचलेले आहेत, निळ्या झेंड्यांनी परिसर सजलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मनुवादी सरकारला परास्त करून निळ्या झेंड्याची व हत्तीच्या शक्तीची सरकार आणण्यासाठी या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.