तालुक्यातील रोजगार सेवक नागपूर हिवाळी अधिवेशना करिता रवाना..
प्रशांत जुमनाके / वणी
वणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक हे पद निवड केल्या जातात. शासनाच्या विविध योजनांची माहिती गावकऱ्यांना मिळावी त्या करिता गाव पातळीवर रोजगार सेवक करतात.
२६/१२/२०२२ ला यशवंत स्टेडियम पासून ते विधान भवन पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्या मोर्चात सहभागी होऊन आपल्या रोजगार सेवकांच्या मागण्या घेऊन वणी तालुक्यातील सर्व रोजगार सेवक सहभागी होण्याचे हेतूने तथा त्यांचे मागण्या
१)अकृतिक सम योजना करून शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे.
३)किमान वेतन कायदा अंतर्गत ठराविक मासिक वेतन देण्यात यावे..
३) एम.एस.एस.अंतर्गत हजेरी घेणे बंधनकारक असल्याने अँड्रॉइड मोबाईल व नेट पॅक देण्यात यावे.
४) विमा संरक्षण प्रदान करण्यात यावे. प्रलंबित देयक त्वरित देण्यात यावे.
५) मिळणारे मानधन वयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे. अश्या विविध मागण्यांना घेऊन वणी तालुक्यातील सर्व रोजगार सेवक सदर नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार असल्याने आज दिनांक २६/१२/२०२२ वणी तालुक्यांतील सर्व रोजगार सेवक नागपूर करिता रवाना झाले आहेत..