सिंधीवाढोना येथे पूज्य सानेगुरुजी जयंती साजरी
चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाची भेट
सुरेंद्र इखारे वणी – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा येथे दिनांक 24 डिसेंबर 2022 ला रोज शनिवारी सकाळी पूज्य साने गुरुजी यांचे जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री गणपतीभाऊ आवारी, हे होते प्रमुख पाहुणे म्हणून मा विजय गंधेवार , मा. श्री विनोदजी निखाडे ,सरपंच ग्रामपंचायत सिंदीवाढोणा, मा.श्री ज्ञानेश्वरजी गानफाडे, पोलीस पाटील, उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच आदरणीय श्री विजय जी गंधेवार सर यांनी विद्यार्थ्यांना अनेक सुरेल आवाजात गीत म्हणून दाखविले तसेच समूहगीताच्या व स्वागत गीताच्या चाली सांगितल्या, विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना वाचनीय शंभर पुस्तके शाळेला भेट देऊन . मूल्यशिक्षण व कचऱ्यापासून टिकाऊ कलाकृती यावर आधारित मार्गदर्शन केले यासोबत मान्यवरांच्या हस्ते विविध औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण शालेय परिसरात करण्यात आले यामध्ये पिंपळ पंढरपुरी तुळस मोगरा या प्रकारचे वृक्ष लावण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील वाटेकर यांनी केले तर मार्गदर्शनानंतर साहित्याची प्रदर्शनी भरवण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी मधले सर्व साहित्य हाताळले. कार्यक्रमाचे संचालन कु. हर्षदा चोपने मॅडम यांनी केले .तर आभार बालाजी मुद्दमवर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री बालाजी मुद्दमवार सर व सौ नेहा गोखरे मॅडम यांनी सहकार्य केले.