हिवरा मजरा येथे राष्ट्रीय गणित दिवस व साने गुरुजी जयंती साजरी
सुरेंद्र इखारे वणी – मराठी विज्ञान परिषद विभाग यांच्यावतीने राष्ट्रीय विद्यालय हिवरा – मजरा येथे सानेगुरुजी जयंतीच्या निमित्ताने तसेच गणित दिवसाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजण करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. प्राध्यापक महादेवराव खाडे , मा. श्री लक्ष्मणराव ईद्दे , मा. अभय पारखी उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मा.श्री भारत गारघाटे हे होते . राष्ट्रीय गणित दिवस व सानेगुरुजी जयंती च्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी
विद्यार्थ्यांना रूक्ष व कठीण वाटणारा गणित विषय सोप्या व रंजक पद्धतीने शिकविल्या गेला तर विद्यार्थ्यांना गणिताची भिती वाटणार नाही, याकरीता अतिशय रंजक पद्धतीने परीसरातील अंकगणित, गणित कोडे, विनोदाच्या अंगाने कुटप्रश्न व गणिताच्या जादूइ पद्धतीने विद्यार्थ्यांनी मनात धरलेला अंक ओळखने अश्या अनेक उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी चांदणे यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय विद्यालय हिवरा मजरा चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले