आरटीआय कार्यकर्ते मा. दादाजी ल.पोटे यांचा ६२ वा वाढदिवस साजरा..
प्रशांत जुमनाके वणी : जन सामन्याचे समस्यांना धाऊन जाणारे तथा सामाजिक आपुलकीने प्रेरित असलेले जनसेवक मा. दादाजी ल.पोटे यांचा ६२ वा वाढदिवस वणी येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
जनसेवक मा. दादाजी ल.पोटे यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व,तडफदार नेतृत्व असलेले व्यक्ती सदा सर्वदा गरिबांच्या समस्यांना दूर करतात. निस्वर्ती सेवा देऊन त्यांनी आपले वणी परिसरात नाही तर अख्या यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी एक ओळख निर्माण केलेली आहेत. जनसेवक मा. दादाजी ल.पोटे यांना पूर्वी पासून जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य अंगीकारले आहेत. आणि वणी येथील गोर गरिबाच्या असलेल्या समस्या कश्या दूर कराच्या याकडे त्यांची नेहमीच धडपड असते.
सन २००९ मधे जनसेवक मा. दादाजी ल.पोटे यांनी आर.टी.आय मध्ये प्रवेश करून तालुका पातळीवर कार्यकारणी गठीत करण्यात आली. आणि सचिव या पदावर सर्वप्रथम नियुक्ती करण्यात आली . यावेळेस पोटे यानी आपली वाटचाल वणी तालुक्यात चालू केली असून आरटीआय चे माध्यमातून अनेक कार्यालयाला वाचा फोडण्याचे कार्य जनसेवक मा. दादाजी ल.पोटे यांनी केले .आणि आज ते आरटीआय संघटक प्रचारक (यवतमाळ) या पदावर कार्यरत असून त्यांनी
अनेक ग्रामपंचायत, नगर पालिका,तहसील कार्यालय,बांधकाम विभाग,एम.एस. सी.बी.कार्यालय याचे भोंगळ कारभार उघडकीस आणून बरेच अधिकाऱ्यांना धारेवर धरून दंड ठोठावला आणि आजही यवतमाळ जिल्ह्यात निर्भिड पने सेवा कार्य चालू आहे ..अश्या तडफदार व्यक्तीचा दिनाक २८/१२/२०२२ रोजी वाढदिवस वणी आरटीआय कार्यकर्त्यांचे वतीने साजरा करण्यात आला…