25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

राजूर येथे क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले जयंती 

राजूर येथे क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले जयंती   

विविध सामाजिक, सांस्कृतिक ,नृत्य स्पर्धांचे   आयोजन.

प्रशांत जुमनाके वणी -:         तालुक्यातील राजुर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राजूर नगरी मध्ये ३ ते ५ जानेवारी २०२३ ला ३ दिवसीय भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन राजूर तर्फे करण्यात आले आहे.
दिनांक २५ डिसेंबर २०२२ ला सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धा घेण्यात आली.
दिनांक ३ जानेवारी २०२३ ला सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान,मेघे सावंगी चे सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबिर, तसेच सकाळी १० वाजता शालेय चमू सह भव्य आकर्षक मिरवणूक , नंतर लगेच 11 वाजता मा. उद्घाटक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी ६ वाजता अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा चेतन सेवांकुर आणि संच सादर करतील.
दिनांक ४ जानेवारी २०२३ ला सायंकाळी ६ वाजता भव्य नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी 8657412389 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
दिनांक ५ जानेवारी २०२३ ला सायंकाळी ६ वाजता प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा जाहीर समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या ३ दिवसीय कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समिती तर्फे करण्यात आले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News