* वणी तालुक्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पीकविमा नुकसान भरपाई मागणी *
* शेतकऱ्यांनी दिले एसडीओला निवेदन *
*न्याय मागणी हक्कासाठी आंदोलनाचा इशारा *
सुरेंद्र इखारे वणी – सततचा पाऊस ,अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई 100 टक्के देण्याच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर व समस्त शेतकरी बांधवांनी मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे याना दिले . पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत उपविभागतील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विश्वासावर शासनाच्या पीक संरक्षण योजनेत अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया ली कडे कृषी कर्जधारक ,गैरकर्जदार यांनी बँक खात्यातुन व स्वतः विमा कंपनीकडे हप्ता भरला आहे प्रति हेक्टर शेतकरी हिस्सा कापूस 2310 रुपये सोबत केंद्रराज्य हिस्सा एकूण 4620 रुपये सोयाबीन 924 रुपये केंद्रराज्य हिस्सा 693 रुपये तूर 736 रुपये केंद्रराज्य हिस्सा 7360 रुपये ज्वारी 570 रुपये केंद्रराज्य हिस्सा 2566 रुपये याप्रमाणे वणी तालुक्यातील 134 महसुली गाव व 14 हजार 25 पीक विमा धारक शेतकरी 13 हजार 280 हेक्टर क्षेत्र 7 कोटीच्यावर शेतकरी केंद्रराज्य सरकार मिळून विमा हप्ता भरला आहे. सततचा पाऊस व अतिवृष्टी ची शासन महसूल नोंद घेतली त्याप्रमाणे वणी तालुक्यातील वहीतीखाली 64 हजार 30 हेक्टर, पूर अतिवृष्टी बाधित 53 हजार 966 हेक्टर, खरडणे,भरपडणे, यासाठी शासनाने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये व 37 हजार 600 नुकसान भरपाई दिली. असे 90 टक्के नुकसान वणी तालुक्यात झाले आहे. व तसा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहेत. तसेच वर्धा,पैनगंगा, निर्गुडा, विदर्भ या नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून शेतपिके बुडून व भरपडल्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न शून्य झाले त्यामुळे नुकसान पंचनामे फॉर्म भरून निश्चित करण्यात आले आहे. विमा हप्ता शेतकरी केंद्रराज्य कापूस 4620 रुपये सोयाबीन 6931 रुपये भरले विमा संरक्षण रक्कम 46200 प्रति हेक्टरी परंतु विमा कंपनीने 31 डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात विमा मोबदला प्रति हेक्टर 5700 सोयाबीन 9721 रुपये बँक खात्यात जमा केली.नुकसान पंचनामा 80 टक्क्यांच्या वर असताना भरपाई मात्र 10 टक्के जमा झाली परंतु 100 टक्के नुकसान भरपाई गुणक आहे. परंतु नुकसान भरपाई पेरणी लागवड अवस्थेपेक्षाही कमी देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक व नुकसान भरपाई हक्कापासून वंचीत केल्या जात आहे ही बाब गंभीर व अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोणत्या पध्दतीने देण्यात येत आहे. याबद्दल विमा कंपनी व प्रशासन सांगणार काय? तालुक्यात शेतकर्यांचे 90 टक्केच्या वर नुकसान लक्षात घेता 100 कोटीचे वर नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. वणी तालुक्यातील 9 मंडळ यामध्ये शिंदोला, पुनवट, शिरपूर, भालर, कायर, राजूर, रासा, वणी, गणेशपूर येथे 65 मिमी पाऊस अतिवृष्टी बाधित क्षेत्र त्यामुळे येथील शेतकरी पूर्ण बरबाद असताना शासन निर्णयाप्रमाणे तालुका पीकविमा तक्रार निवारण समिती व संबधीत प्रमुखांनी पंचनामप्रमाणे खुलासा करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे न्याय मागणीसाठी 16 जानेवारीला तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी विमा कंपनी व प्रशासनाची राहील संबंधित निवेदनाच्या प्रति आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार वणी, पोलीस निरीक्षक वणी, याना देण्यात आले आहे यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर व समस्त शेतकरी वर्ग होता.