Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorizedमनिषा तिरणकर "रत्न श्री 2022 अवॉर्डने सन्मानित.

मनिषा तिरणकर “रत्न श्री 2022 अवॉर्डने सन्मानित.

मनिषा तिरणकर “रत्न श्री 2022 अवॉर्डने सन्मानित.

प्रशांत जुमनाके वणी :  यवतमाळ येथील  मनिषा तिरणकर ह्या अ.भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षा असून त्या शोषित पीडित महिला व लोक अधिकाराची लढाई लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वात
संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील बालक,मुलीं,महिला वरील वाढत्या अत्याचारा विरोधात गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद कार्यरत आहे.अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद माध्यमातून अनेक मुलीं व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असल्याने आजवर मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मनिषा वसंतराव तिरणकर ह्या सामाजिक कार्य करत असून महिलांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवितात ,स्वतः रक्तदान करुन रक्तदान करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करणे,मतिमंद मुलांना मदत करणे,कोरोणा विषाणुच्या प्रादृभावाने प्रभावित झालेल्या लोकांना जिवनावश्यक वस्तु पुरविणे तसेच अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदच्या माध्यमातून राज्यातील पिढीतावर होणारे अन्याय,अत्याचारांची अनेक यांनी मार्गी लावले असून या सेवाभावी कार्याची दखल घेऊन नॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांना रत्न श्री 2022 हा अवॉर्ड देण्यात आला आहे.यावेळी नॅशनल चाइल्ड अँड वूमन डेव्हलपमेंट कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डाॅ.बिरेन दवे,राष्ट्रीय उपाध्यक्ष रचना भिमराजक,माया ठाकुर,रोजी आर्येन आदिंच्या प्रमुख उपस्थितीत अवार्ड देण्यात आला.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments