सुरमनी पंडित प्रभाकर धाकडे यांचे दुःखद निधन।
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी – सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार सुरमनी पंडित प्रभाकर धाकडे यांचं आज दिनांक 07 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता वयाच्या 74 व्या वर्षी नागपूर येथे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 08 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांच्या ” उत्कर्ष निर्माण” सदर नागपूर येथील राहत्या घरून निघेल आणि अंत्यसंस्कार मोक्षधाम घाट रोड नागपूर येथे करण्यात येतील .