23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत स्वातंत्र्याची व सत्तेत भागीदारीचे प्रावधान केले

बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत स्वातंत्र्याची व सत्तेत भागीदारीचे प्रावधान केले

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी -:        गोलमेज परिषद मध्ये विविध पक्षाचे व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अस्पृश्यांच्या प्रतिनिधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रावबहादुर श्रीनिवासन यांची निवड झाली होती. यामध्ये उदारमतवादी, महिला, पारसी, हिंदू महासभा, शीख व मुस्लिम आदींचेही प्रतिनिधी सहभागी झाली होते. यावेळी बाबासाहेबांनी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. लोकशाही शासन व अस्पृश्यांची सत्तेत भागीदारी मागितली. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जयंत साठे यांनी व्यक्त केले ते बहुजन हिताय संघाच्या वतीने आयोजित साप्ताहिक कार्यक्रमात बोलत होते.
दिनांक 12 नोव्हेंबर 1930 ते 24 डिसेंबर 1932 या कालावधीत तीन गोलमेज परिषदा पार पडल्या. या गोलमेज परिषदेच्या संघीय रचना, प्रांतीय संविधान कमिटी, अल्पसंख्यांक, मताधिकार, संरक्षण व सार्वजनिक सेवा या कमिट्या आहेत. प्रांतीय संविधान कमिटी व अल्पसंख्यांक कमिटी मध्ये आपले मनोगत मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, अस्पृश्य हे अल्पसंख्यांक असले तरी इतर मुस्लिम, पारसी व ख्रिश्चनांपेक्षा त्यांची दयनीय स्थिती आहे. सनातनी हिंदूंचे राज्य आले तर ते समान न्यायाचे तत्व वापरणार नाही, म्हणून अस्पृश्यांना कायदेमंडळ सार्वजनिक सेवा यामध्ये स्थान द्यावे भावी राज्यघटने त्यांचे हक्क अबाधित करावे.असे मुख्य मुद्दे बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केले होते.
दुसरी गोलमेज परिषद होण्यापूर्वी मनीभवन येथे गांधी – आंबेडकर यांची भेट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत केलेल्या कार्याचा वृत्तांत गांधीजींनी माहीत करून घेतला होता. त्यावरूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशप्रेमाबद्दल ओतप्रोत भरलेले वक्तव्य पाहून संपूर्ण जागतिक कीर्तीच्या वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली होती. त्यामुळे नाईलाजाने भारतीय वृत्तपत्रांनाही दखल घ्यावी लागली. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी दोन बकऱ्या घेऊन गेले तर पं. मदन मोहन मालवीय देवपूजेसाठी चार हांडे गंगाजल घेऊन गेले होते तर डॉ.बाबासाहेबांनी चार ट्रंक पुस्तके नेली. जगातले सगळे संविधान त्यात होते. ते संविधान नऊ दिवस व रात्री वाचून काढले. अशा तऱ्हेने संपूर्ण जगातील संविधानाचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांचे हितसंरक्षण व या देशाचे भावी स्वातंत्र्य आणि भावी राज्यघटना कशी असली पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले होते. गांधीजींनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काला मान्यता दिली नाही. अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग आहे असे त्यांचे म्हणणे होते. यावेळी मंचावर डॉ. शंकर खोब्रागडे, भीमराव मेश्राम आदी उपस्थित होते. सुरूवातीला तथागत गौतम बुद्ध व परपुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News