25 C
New York
Saturday, July 13, 2024

वणी तालुक्यातील नदी लगतच्या खरडलेल्या क्षेत्रासाठी 30 लाखाचे अनुदान 

वणी तालुक्यातील नदी लगतच्या खरडलेल्या क्षेत्रासाठी 30 लाखाचे अनुदान   

जुनाड गाव वंचीत * 62 शेतकरी खातेदार अपात्र   शेतकरी समाधानी       

सुरेंद्र इखारे वणी –  तालुक्यात झालेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांना दोन हेक्टरी वरील नुकसान भरपाईचा लाभ देण्याबाबतचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले.      माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पत्राची दखल घेऊन तात्काळ कारवाई करून महापूर व अतिवृष्टी तसेच नदी लगतच्या गावातील खरवडलेल्या क्षेत्रासाठी वणी तालुक्यातील 14 गावातील 228 शेतकरी खातेदारांना 176.69 हेक्टर क्षेत्रासाठी 42 लाख 58 हजार 931 रुपये अनुदानाची मागणी केली यामध्ये 166 शेतकऱ्यांना 123.39 हेक्टर क्षेत्रासाठी 29 लाख 73 हजार 111 रुपयांचे तात्काळ अनुदान प्राप्त झाले असून यामध्ये प्रामुख्याने 62 शेतकरी खातेदार अपात्र ठरली आहे.     वणी तालुक्यातील वर्धा, निर्गुडा या नदीकाठावरील खरडलेल्या क्षेत्रासाठी 14 गावातील जसे उकणी येथील 10 शेतकऱ्यांना एक लाख 10 हजार 896 रुपयांचे अनुदान प्राप्त, झोला येथील 5 शेतकऱ्यांना 65 हजार 625 रुपये, सावंगी च्या 26 शेतकऱ्यांना 97 हजार 990 रुपये, नायगाव बु 37 शेतकऱ्यांना 8 लाख 29 हजार 330 रुपये, चिंचोली 20 शेतकऱ्यांना 2 लाख 32 हजार 120 रुपये, रांगणा येथील 22 शेतकऱ्यांना 6 लाख 94 हजार 295 रुपये, भुरकी च्या 19 शेतकऱ्यांना 5 लाख 5 हजार 485 रुपये, शेलू खु 6 शेतकऱ्यांना 2 लाख 48 हजार 560 रुपये, शिवणी ज 14 शेतकऱ्यांना एक लाख 21 हजार 890 रुपये, साखरा को 3 शेतकरी 33 हजार 460 रुपये, जुगाद 2 शेतकरी 11 हजार 950 रुपये, माथोली एक शेतकरी 7 हजार 170 रुपये, जुनाड येथील शेतकरी वंचीत , कुंभारी एक शेतकरी 14 हजार 340 रुपये, असा एकूण 166 शेतकरी खातेदारांना 29 लाख 73 हजार 111 रुपयांचे खरडलेल्या क्षेत्रासाठी शासनाने अनुदान दिले असून  माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी दिलेल्या लढ्याला यश आले व यांच्या प्रयत्नामुळे   शासनाने वणी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ दखल घेतल्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिवाळीचा सण व रब्बी हंगामात मदतीचा हात मिळाल्याने शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानले इतकेच नव्हे तर हवालदिल शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केल्याचे वणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे असे मत जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी “वणी 24 न्यूज ” च्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News