25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

कोळशाची तस्करी करणारे  आठ हायवा टिप्पर वणी पोलिसांच्या ताब्यात   

कोळशाची तस्करी करणारे  आठ हायवा टिप्पर वणी पोलिसांच्या ताब्यात       

प्रशांत जुमनाके वणी – येथील ठाणेदार प्रदीप शिरस्कर याना गोपनीय माहिती मिळाली की मुकुत्बन ते वणी या रोडवर जडवाहतुक करणारे वाहन हे अवैध कोळश्याची वाहतूक करीत आहेत अशा खबरे वरून स्थानिक गुन्हा शाखा यांनी मुकुटबन ते वणी रोडवर पेटूर येथे सापळा रचून जडवाहतुक करणारे आठ वाहन ताब्यात घेतले.      त्यांच्याकडून कोळसा वाहतूक करण्यासंदर्भात कागद पत्रांची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे त्यांनी सादर केली नसल्याने नमूद वाहन हे डिटेन करून कार्यवाही करण्यात आली या वाहनांमध्ये एकूण अंदाजे 20 लाख 80 हजार रुपयांचा कोळसा व वाहनांची अंदाजे किंमत 2 कोटी 21 लाख असा एकूण 2 कोटी 41 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास स पो नी माधव शिंदे हे करीत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजालवर , पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात माधव शिंदे, अमोल मुडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, महेश नाईक, सुधीर पिदूरकर, हरींदर भारती, वसीम शेख, सतीश फुके, सुरेश कनाके, यांनी केली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News