अडेगावात जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
घरोघरी जिजाऊ माँ साहेबाना मानवंदना
सुरेंद्र इखारे वणी – झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथे १२ जानेवारी रोजी जिजाऊ माँ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अडेगावांत मोठ्या संख्येत घरोघरी जिजाऊ पूजन करून जिजाऊ माँ साहेबांना मानवंदना दिली गेली. अडेगाव येथील जिजाऊ चौक येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व गावकऱ्याच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माल्यार्पण, दीप प्रज्वणन करून सामूहिक जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन कार्यक्रम पार पडला.
यावेळी ग्रा.पं सदस्य दिनेश ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष झाडे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष शंकर झाडे, मा. ग्रा.पं सदस्य अशोक पानघाटे, संतोष ताजने, संदीप आसुटकर, दीपक हिरादेवे, देव येवले, विवेक सोनटक्के, संजय पावडे, राजू झाडे, विनोद ठाकरे, बंडू चिंचुलकार, विजय भोयर, सुमित क्षीरसागर, मंगेश झाडे, संदीप येवले, सारंग आसुटकार, गणेश क्षीरसागर, अतुल गौरकार व इतर गावकऱ्यांची उपस्थिती होती