विद्यानिकेतन येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
सुरेंद्र इखारे वणी – मारेगाव येथील विद्यानिकेटन इंग्लिश मिडीयम ऑफ ज्युनिअर सायन्स कॉलेज येथे राजमाता जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष संध्या पोटे ह्या होत्या प्रमुख पाहुणे मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बोंडे तसेच प्रमुख वक्ते महेश ढेंगळे हे होते यावेळी अध्यक्षीय भाषणात संध्या पोटे म्हणाल्या राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या आचरणात आणावे हीच त्यांना खरी आदरांजली होय असे प्रतिपादन केले. जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत कु उमाई डोंगरकर, तर स्वामी विवेकानंद च्या वेशभूषेत कृपा दुपारे ही होती तसेच शालेय विद्यार्थ्यांनीही नृत्याविष्कार सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरजित कळसकर यांनी केले तर आभार कुणाल गेडाम यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तथा अकरावीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.