23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्ये संदर्भात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सादर

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्ये संदर्भात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सादर
———————————————
शासनाचे विविध समस्यांकडे लक्षवेधून तात्काळ समस्या सोडविण्याची केली ऍड किरण सरनाईक यांनी  मागणी 

———————————————
सुरेंद्र इखारे वणी  –  शिक्षण क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांमुळे शिक्षण कार्य सुरळीत होत नाही व परिणामी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.  अमरावती विभागाचे कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार मा. श्री किरणराव सरनाईक यांनी विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यामध्ये थकीत वैद्यकीय देयके, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते, डीसीपीएस/एन पी एस खाते नसलेल्यांसाठी सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने मिळणे, नगरपरिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा वैद्यकीय प्रतिपुर्तीचा लाभ मिळणे, स्वयंअर्थ सहाय्यीत शाळांना मान्यता बृहत आराखड्यानुसार देणे, शिक्षक भरती व 0ते 20 पट असलेल्या शाळा बंद न करणे इ.महत्त्वाच्या समस्या समाविष्ट होत्या. मा.शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांनी या संदर्भात लवकरच समस्या सोडविल्या जातील असे सांगितले.
अधिवेशन काळात सभागृहामध्ये अनेक समस्या असल्यामुळे प्रतिनिधींना जास्त वेळ मिळत नाही. यातही जास्तीत जास्त समस्या मांडण्याचा प्रयत्न हे प्रतिनिधी करत असतात. मा.श्री किरणराव सरनाईक यांच्याकडून सुद्धा सदैव सर्वव्यापक दृष्टिकोनाची प्रचिती येते. शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त घटकांच्या समस्या  मांडल्या  व शासनाचे  विविध समस्येकडे लक्षवेधुन तात्काळ समस्या निकालात काढण्याचा प्रयत्न केला.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News