वणीतील युवकांना आता ” छत्रपती ढोल – ताशा पथक ” मध्ये सहभागी होण्याची संधी,,,
कार्तिक पटेल वणी – शहरात साजरे होणाऱ्या सण उत्सवात तथा सामजिक कार्यक्रमात लावण्यात वाजवल्या जाणाऱ्या मराठमोळ्या संस्कृती परंपरा जोपासत ढोल – ताशा पथकाला बाहेरून पाचारण करण्यात येते. आता वणी शहरात लवकरच छत्रपती ढोल ताशा पथकाचे आगमन झाले आहे. शहरातील सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी तसेच विविध उत्सवात छत्रपती ढोल ताशा पथकाचे विशेष आकर्षण राहणार आहे. ” नाद या ठेक्याचा , मान या भगव्याची आणि रुबाब फक्त या नावाचा…” लवकरच वणी शहरात छत्रपती ढोल ताशा पथकाची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे वणी शहरातील इच्छुक सभासदांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन छत्रपती ढोल ताशा पथक समिती यांनी केले आहे. सभासद नोंदणीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधा 8805614404,8668825689,9158536862, 7559468488, 9637016192