23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

कॉंग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार नाही -आमदार आशिष देशमुख

कॉंग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार नाही -आमदार आशिष देशमुख

नागपूर प्रतिनिधी जयंत साठे:नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉग्रेसचे समर्थन कुणाला, यावरून सगळा घोळात घोळ सुरू आहे. काल माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार सुनील केदार यांनी विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. पण त्या नेत्यांना तो अधिकार नाही, ते त्यांचे वैयक्तिक मत असावे, असे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज सांगितले.
या निवडणुकीत कॉंग्रेसने समर्थन कुणाला द्यायचे, यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घोळात घोळ घालत आहेत. कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार सुनील केदार यांनी काल वडेट्टीवार यांच्या घरी बैठक घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. याबाबत विचारले असता डॉ. देशमुख म्हणाले, तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. वैयक्तिकरीत्या त्यांनी अडबालेंना समर्थन दिले असेलही. पण ती कॉंग्रेसची भूमिका नाही.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. परिणामस्वरूप ॲड. अभिजित वंजारी यांनी मोठा विजय त्याठिकाणी मिळविला होता. त्यावेळी राजेंद्र झाडे यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी शिक्षक मतदारसंघात मदत करण्याचे वचन दिले होते. ते वचन आपण पाळत आहो आणि त्या वचनाची पूर्ती म्हणून राजेंद्र झाडे यांना आज समर्थन जाहीर केले आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे हे विजयी होऊ शकणारे उमेदवार आहेत, असे डॉ. आशिष देशमुख म्हणाले. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशीसुद्धा याविषयी बोलणार आहे. या दोन्ही नेत्यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघात राजेंद्र झाडे यांना समर्थन द्यावं, अशी मागणी करणार आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आता राजेंद्र झाडे यांना समर्थन द्यावे. महाविकास आघाडीचे समर्थन मिळाल्यास राजेंद्र झाडे हे हमखास निवडून येतील, असा विश्‍वास डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केला. नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पद सांभाळता येत नाही. त्यामुळे त्यांना हटवण्यात यावे, या मागणीचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News