मंदर येथे लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
सुरेंद्र इखारे वणी – मंदर येथे लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर वणी तालुक्यातील मंदर या गावाला घेण्यात आला. या शिबिरामध्ये प्रार्थना, व्यायाम, श्रमसंस्कार, बुद्धीला चालना देण्यासाठी वेगवेगळे बौद्धिक सत्र या शिबिरामध्ये पार पडले. तसेच जनजागृती , सांस्कृतिक कार्यक्रमासह शिबिराचे समारोप करण्यात आले.
या शिबिरामध्ये 16 जानेवारीला बॉटनी विभागाचे विभागप्रमुख यांनी बौद्धिक सत्रामध्ये ‘शेती काळाची गरज’ या विषयावर गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्यानंतर संध्याकाळी आकाश महादुळे व मंगेश गोहोकार या विद्यार्थ्यांनी ‘शेतकरी आत्महत्या व व्यसनमुक्ती’ या विषयावर जनजागृती व्हावी या हेतूने नाटकांचं सादरीकरण केले, 17 तारखेला डॉ . संदीप केलोडे रसायनशास्त्र विभाग प्रमुख , कला व वाणिज्य महाविद्यालय मारेगाव यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर बौद्धिक सत्रामध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. 18 तारखेला किशोर गज्जलवार बी. डी. ओ. पंचायत समिती वणी यांनी ‘लोकप्रशासन’ या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले,19 तारखेला डॉ. स्वानंद पुंड, यांनी ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ या व्याख्यानात त्यांनी मातृत्वाचं मार्मिकत्व स्पष्ट केले. 20 तारखेला डॉ. प्रा. राजू निखाडे ,विभागीय राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक वर्धा जिल्हा यांनी ‘राष्ट्रीय सेवा योजना व आजचा युवक’ या विषयावर सुंदर असे मार्गदर्शन केले. बौद्धिक विकासा सोबत श्रमसंस्कार पण या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यावर करण्यात आले. त्यात या शिबिरार्थिनी गावकऱ्यांसाठी शोषखड्डे , स्मशान भूमी ची स्वच्छ्ता आणि सौंदर्यकरणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. नीर्गुडा नदीवर बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्पाला चालना दिली, गावात,शाळेत वृक्षारोपण करुन ग्राम स्वच्छता केली अशा रीतीने या सात दिवसांमध्ये गावकऱ्यांना कार्यक्रमांची मेजवानी दिली . या शिबिराला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांनी भेटी दिल्या . शिबिराचा समारोपीय कार्यक्रमाला सकाळी गावातून प्रबोधनात्मक दिंडी काढण्यात आली विविध वेशभूषा सह , विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रो. मानसकुमार गुप्ता , इंग्रजी विभागप्रमुख व प्रभारी प्राचार्य लो. टि. महाविद्यालय वणी, यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषविले,सरपंच वर्षा बोढे उपसरपंच वंदना उपरे ,ग्रामपंचायत सदस्य अनंतराव बोढे,वैशालि परसुटकर, शुभांगी थाटे,हेमलता पोटे,विनोद मोहितकर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जबीता शेख,शालिनी दर्वे तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापक पि .बी. बोथकर सर व मेश्राम सर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शिबिरार्थ मनोगत व्यक्त करतांना हे शिबीर आमच्या गावात झाले. हे आमचे भाग्य या सात दिवसात गावामध्ये शोषगड्डे ,वृक्षलागवड,नदीवर बंधारा, ग्राम स्वच्छता या सारखे अनेक उपक्रम या शिबिराने गावामध्ये राबविले तसेच आधुनिक विचारांचा गावात प्रचार प्रसार या शिबिराने केलात अतिशय उत्तम असे कार्य या शिबिराकडून करण्यात आले असे मनोगत व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . प्रो. मानस कुमार गुप्ता यांनी हे शिबीर परिवर्तनाचं व्यासपीठ आहे असे मनोगत व्यक्त केले, तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले अभिप्राय नोंदविले यात वैष्णवी निखाडे,सरस्वती डांगे,गौरव नायनवर,करण धुरके यानी या शिबिरामुळे त्यांच्यात झालेला बदल त्यांनी व्यक्त केला. शिबिरा मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या गटांना बक्षीस देण्यात आले. तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. वैष्णवी निखाडे, कू. सोनल सुरपाम , साई दुधलकर, आणि गौरव नायानवांर यांची निवड झाली. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारि डॉ. प्रा. नीलिमा दवणे यानी केले राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज अध्यक्षांच्या हातांनी उतरविण्यात आला . संजय बिलोरीया यांनीसुद्धा शिबिराच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ निलिमा दवणे व डॉ विकास जुनगरी यांनी केले.या शिबिरामध्ये 100 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.