वणी ते कोरपना रस्त्याचे झाले तीनतेरा
अपघाताला जबाबदार कोण ?
आमदाराला लक्ष देण्याची गरज
सुरेंद्र इखारे वणी– वणी ते कोरपना या राज्यमार्गावरील रस्त्याची पार वाट लागून गेली आहे कित्येक दिवसापासून येथील प्रवासी गावकरी जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहे. अनेकदा या रस्त्यावर अपघात होऊन अनेक तरुण नागरिक जीवानिशी गेले आहे व अनेकांना अपंगत्व आले आहे तरी येथील लोकप्रतिनिधीला याचे काहीही सोयरसुतक वाटत नाही परंतु लोकप्रतिनिधीचे याच रस्त्याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. वणी ते कोरपना या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली परंतु या निगरगट्ट शासन प्रशासनाला जाग का येत नाही . या रस्त्यावर मोठा अपघात होऊन अनेकांचा जीव गेला असताना सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन मूग गिळून का ? अशी चर्चा गावकऱ्यात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गावकरी वणी ते कोरपना या राज्यमार्गाची दुरुस्ती ची वाट पाहत आहे परंतु रस्त्याच्या दुरावस्थामुळे येथील गावकरी परेशान आहे . या वाहतुकीच्या रस्त्यावर मोठे मोठे पसरट खोल खड्डे पडल्याने वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे इतकेच नव्हे तर शेतावर जाणाऱ्या शेतमजुरांना पायी चालताना खड्ड्यात पाय जाऊन अपंगत्व येत आहे . रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नाही त्यामुळे “साहेब तुम्हीच सांगा कोणता खड्डा चुकवायचा” रस्त्यावरील खड्डे चुकवता चुकवता अनेकांचा अपघात होऊन जीव गेला आहे तसेच अपंगत्व सुध्दा आले आहे . तरी सुद्धा शासनाचे दुर्लक्ष आहे. या राज्यमार्गावर बाजारपेठ,पोलीस स्टेशन, व महत्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा महाविद्यालयात आहे या रस्त्याच्या मार्गातील गावकर्यांना रात्री बेरात्रीच्यावेळी गरोदर माता, आजारी बालके, व वयोवृद्ध याना या मार्गातून उपचार घेण्यासाठी जावे लागते त्यामुळे गावकऱ्यांनी अनेकदा राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले असूनसुद्धा दखल घेण्यात येत नाही तेव्हा शासनाने यामार्गावरून प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांचा अंत पाहू नये कारण राज्य मार्ग असल्याने मोठ्याप्रमाणात कोळसा सिमेंट, गिट्टी यासारख्या जडवाहतुकी सोबतच दुचाकी, चार चाकी, ट्रक, प्रवासी वाहतूक, बस, आतातर शेतकऱ्यांच्या मालाची येजा सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या दुर्घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार तर आहेच परंतु त्यासोबत स्थानिक आमदार सुद्धा आहे असे गावकऱ्यात बोलले जात आहे . तेव्हा न्यायपालिकेनेच न्याय केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्या रस्त्याचे गांभीर्य व नागरिकांच्या जीवाचे महत्व विचारात घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.