25 C
New York
Saturday, July 13, 2024

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ” वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे” या उपक्रमातून महिलांचे सबलीकरण।  

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ” वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे” या उपक्रमातून महिलांचे सबलीकरण।          

 सुरेन्द्र इखारे वणी –  येथील  सन्मान स्त्री शक्ती  फाऊंडेशन वतीने भालर येथे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे हा कार्यक्रम  आयोजीत करण्यात आला.       कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्षा सौ. किरण ताई देरकर  ह्या उपस्थित होत्या . तसेचसोबतच  योगीताताई मोहोड सरपंच लाठी,मेश्राम मॅडम  ,सौ.शकुंतलाताई हेपट श्रीमती मीराबाई  देठे उपस्थित होत्या.यावेळी   भालर परिसरातील  300 पेक्षा जास्त महिलानी उपस्थित लावली होती . याप्रसंगी संस्थापक अध्यक्षा किरण ताई देरकर यांनी उपस्थीत महिलांना  समाजातील चालीरीती ,विधवा प्रथा,रुढी-परंपरा ह्या गोष्टी समाजाला कशा घातक आहे त्या बद्दल मौलिक मार्गदर्शन केले .तसेच  परिसरातील महीला वर्ग यांना सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनची चळवळ  प्रत्येक स्त्री पर्यंत कशी पोहचेल आणि त्या माध्यमातून महिलाचे सक्षमीकरण करुन  महिलांना न्याय- हक्क मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना जागृत करण्यासाठी भालर  गावात सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन ची स्थापना केली ही संघटना नेहमी तत्पर असेल असे आश्वासनच नाहीतर विश्वास निर्माण केला .      यावेळी  गावातील पोलीस पाटील अर्चना हेपट,आषा सेवीका , सौ. सुकेशीना देठे , संगीता टीकले ,अंगणवाडी सेवीका शोभाताई दोडके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.वैशाली देठे यांनी केले या  प्रास्ताविकामधुन  “सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन”  यांच्या कार्यावीषयी विशेष माहीती दीली. यावेळी मनोगत व्यक्त करताना डाॅ.पुुजा वैद्य यांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.गावातील विधवा महिलाना वाण देउन आपल्या बोलण्यातूनच  नाही तर कृतीतून समाज बदल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. तसेच उपस्थीत महिलांनी आपल्या कला सादर केल्या. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या सदस्या वैशाली देठे, शारदा चिंतकुंटलवार,सुरेखा ढेंगळे,मीनाक्षी मोहीते,अर्चना पिदूरकर,वेणु  झोडे व  गावातील सर्व महीला भगीणी.गावातील सरपंच, सर्व महीला बचत गट व युवकांनी सहकार्य केले .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News