Saturday, November 2, 2024
Google search engine
HomeUncategorizedप्रजासत्ताक दिनी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विवेकानंद विद्यालयाचे घवघवीत यश

प्रजासत्ताक दिनी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विवेकानंद विद्यालयाचे घवघवीत यश

प्रजासत्ताक दिनी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विवेकानंद विद्यालयाचे घवघवीत यश

सुरेंद्र इखारे वणी : –          येथील  विवेकानंद विद्यालयाने 74 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन घवघवीत यश संपादित केले आहे.                                        शासकीय मैदानावर आयोजित परेड संचालनामध्ये उत्कृष्ट मार्चिंग करून आरएसपी पथकाने द्वितीय क्रमांक पटकाविला. शासकीय मैदानी सांस्कृतिक कार्यक्रमात कोरोना योद्धांना समर्पित नयनरम्य नृत्य सादर करून द्वितीय येण्याचा मान पटकाविला. प्रेस वेल्फेअर वणी द्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पूर्व माध्यमिक गटाने उत्कृष्ट आदिवासी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला.यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे ,तहसीलदार निखिल धुळधर, यांचे हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले .तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात घेण्यात आला यामध्ये श्री रामकृष्ण  विवेकानंद मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ शंकररावजी वहाटे ,सचिव अविनाशभाऊ ठावरी , संचालिका वंदनाताई वहाटे ,मुख्याध्यापक दिलीप आसकर, ज्येष्ठ शिक्षक गंगाधर गेडाम, नवनाथ नगराळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी तथा प्रभारी शिक्षकांनी यशासाठी अथक परिश्रम घेतले

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments