राष्ट्रहित संवर्धन समिती च्या वतीने भारत माता पूजन
कार्तिक पटेल वणी – शहरात राष्ट्रीय संवर्धन समितीच्या वतीने वणी शहराच्या मुख्य हृदय असलेल्या टिळक चौकात भारत मातेचे पूजन करण्यात आले . यावेळी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री संजीवरेड्डीजी बोदकुरवार हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय विद्यावाचस्पती प्रा.डॉ.श्री स्वानंदजी पुंड यांनी “अखंड भारत “या विषयावर संबोधन केले.
त्यानंतर राष्ट्रहित संवर्धन समितीच्या सदस्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.यावेळी राष्ट्रहित संवर्धन समितीचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री अनुरागजी काठेड, धवलजी पटेल, नरेंद्रजी पांड्या, सुभाषजी इंगोले, कृष्णाजी पुरावार, सचिनजी पांडे, संजयजी पांडे, महेशजी मेहता, रवीजी रेभे, सुरेंद्र मदान, दीपकजी जैन, डॉ.अनिकेत अलोने, राजेश जी झिलपिलवार, राजेशजी गुंडावार
यांची उपस्थिती होती.