प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर आनंदराव कोसरकर कडून सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट….
प्रशांत जुमनाके वणी – तालुक्यातील पिल्की वाढोणा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन शाळा समीतीचे अध्यक्ष श्री प्रवीण बुरडकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजण करण्यात आले. प्रजासत्ताक दिना निमित्त गावातून शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षित वेशभूषा परिधान करून रैली काढून संपूर्ण गावकऱ्यांचे लक्षवेधले सदर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातील आनंदराव कोसारकर यांनी गावातील शाळेला सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट म्हणून दिली. कार्यक्रमाला उपस्थित शालेय समिती प्रशांत जुमनाके( ग्राम.पं सदस्य पठारपूर ( पिल्की वाढोणा), सुधाकर कोसारकर, संदीप ढेंगळे (तंटामुक्ती अध्यक्ष),अरून झाडे, पंढरी बदखल, ज्ञानेश्वर पावडे, अनिल भादिकर, महादेव कोसारकार, बाळकृष्ण झाडे, मडकाम सर ( शिक्षक ), वैशाली कुमरे ( सेविका ), छाया निब्रड हे उपस्थित होते.