25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

गांधी – आंबेडकरवादाचा समन्वय हवा – डॉ.विश्वंभर चौधरी

गांधी – आंबेडकरवादाचा समन्वय हवा – डॉ.विश्वंभर चौधरी
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी –  : गांधीजींनी चातुर्वर्ण्याचा कधीकाळी पुरस्कार केला होता.गांधी_आंबेडकरात सेंद्रिय बंध होते.वरच्या जातीच्या लोकांनी खालचे काम देणे हे गांधीजींनी सुरू केले होते. सध्या इतिहासाची मोडतोड होत आहे. अफवा पिकवल्या जात आहे.सरदार पटेलांना हायजॅक करण्याचा प्रयत्न होत आहे. महापुरुषांच्या तत्वांची अवहेलना करायची हे धोरण सुरू आहे.चिनचा विकास व हिटलरची हुकूमशाही माहित नाही. लोकशाही टिकली पाहिजे.जी ट्वेंटी च्या लोगोवर कमळ आहे आणि विरोधी पक्ष चूप आहे. गांधीजींच्या विकासाची कल्पना वेगळी होती.ते समजून घेणे आवश्यक आहे.
वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे.कारण चंद्रपूर गडचिरोली ची कामे राजधानीत होत असेल तर राजधानीच इकडे आणावी हे त्यामागचं तत्व आहे . विद्यमान सत्ता जाईल त्यापूर्वी देश रसातळाला गेला असेल. न्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर लगेचच राज्यसभेत दिसतात.हे योग्य नाही. हिंदू राष्ट्रात महिलांचे काय स्थान राहिल.हिंदूराष्ट्र निर्माण झाले तर महिलांना सती जावे लागेल. हे त्यांनी ओळखले पाहिजे. वाट्स अॅप युनिव्हर्सिटी आयआयटी वाले चालविते.संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. आज त्याची गळचेपी होत आहे.बोलण्याच स्वातंत्र्य हिरावून घेतला जाईल. दाभोलकर,कलबुर्गी संपविले. न्यायालये अगतिक झाले आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेबद्दल सांगितले.सामाजिक व राजकिय न्यायाची भूमिका घेतली. महिलांचे यजमान राजकारण करतात.सत्ताधारी समाजवाद व धर्मनिरपेक्षता या दोन शब्दावर आक्षेप घेतात तो चुकीचा आहे. नेहरूंनी आपल्या कार्यकाळात ३९ संस्था निर्माण केल्या.
भारतीय संविधानातील कलम २५ ते ३९ वाचा, त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ही राज्यघटना कोणत्याही धर्माचा पुरस्कार करीत नाही.धर्माला स्वातंत्र्य नाहीतर लोकांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. समता आणि समरसता भिन्न आहे. आवाज बंद होण्याच्या आधी बोलत राहिले पाहिजे.असेही शेवटी ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश द्वादशीवार, तर प्रमुख वक्ते म्हणून विजय दर्डा, अॅड.असित सरोदे उपस्थित होते.
लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती ग्रंथाचे यावेळी प्रकाशन पार पडले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News