25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

दोन युवकांनी वाटला उपेक्षितांसह आनंद

दोन युवकांनी वाटला उपेक्षितांसह आनंद
 

*सलग आठ वर्षांपासूनचा आदर्श उपक्रम*

कार्तिक पटेल वणी:-      जन्मदिवस म्हटलं की पार्टी आलीच. हे अलीकडच्या काळातलं नवं समीकरण झालं आहे. याला फाटा देत दोन युवकांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. संकेत पांडुरंग गंधारे आणि आशीष मारुती पोतराजे अशी ह्या युवकांची नावं आहेत. त्यांनी ह्याही वर्षी आपला जन्मदिवस अनाथ बालके, दिव्यांग आणि वृद्धांसोबत साजरा केला.

संकेत हा गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता आहे. त्याला प्रबोधनकार सत्यपाल महाराजांची प्रेरणा आहे. यावर्षी त्यांनी आनंद बालसदन, अपंग निवासी कर्मशाळा आणि संत बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं. गोकुळ नगर जवळील आनंद बालसदन येथे त्यांनी केक कापला. सोबतच धान्य स्वरूपात देणगीदेखील दिली. या तिन्ही संस्थांमधील सदस्यांशी मनमोकळ्या गप्पा केल्यात.

सलग आठ वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. दरवर्षी ते आपल्या परिसरातील गावांमध्ये सामाजिक जाणिवेसह जन्मदिवस साजरा करतात. यावर्षी त्यांनी वणी शहर निवडलं.

जन्मदिवस हा आनंदाचा भाग असतो. संकेत म्हणतो की, हा आनंद उपेक्षितांसोबत साजरा केला पाहिजे. त्यांची सेवा केली पाहिजे. पार्टी किंवा वायफळ खर्च करू नये. हीच रक्कम सत्कारणी लावावी. शक्य असल्यास सर्वांनीच याचं अनुकरण करावं. इतरांनाही त्यासाठी प्रेरणा द्यावी.

याप्रसंगी उदयपाल वाढई, गणेशपुरचे उपसरपंच प्रशांत खारकर, पांडुरंग गंधारे, अमोल बरडे, तृणाल पोतराजे, भूपेंद्र बोबडे, रवी ढेंगळे, अक्षय चेंडे, चंद्रकांत झाडे, निखिल डवरे, पवन मालेकर, रोशन आवारी, राहुल खिरटकर, स्नेहल तेलंग, शुभम लुटे, लोकेश मांडवकर, रवी चव्हाण आणि संदीप आसुटकर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News