23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

गोल कमानीतील मुख्य बाजारपेठेचे मुत्रीघर सुरू करण्याची मागणी     

गोल कमानीतील मुख्य बाजारपेठेचे मुत्रीघर सुरू करण्याची मागणी      

युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन     

  सुरेन्द्र इखारे वणी-    येथील  गोल कमाणितील मुख्य बाजारपेठेसाठी असलेले पूर्वीपासूनचे मुत्रीघर गेल्या दीड महिन्यापासून नगर परिषदेने बंद करून टाकले आहे व त्या मुत्रीघराला कुलूप लावून त्या मुत्रीघरासमोरील गेटवर  बाजारपेठेतील दुकानदार व ग्राहकांनी नगर परिषद आरोग्य विभागाच्या मागे असलेले मुत्रीघर वापरण्यात यावे असे बोर्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे  मुत्रीघर बंद आहे मात्र हे मुत्रीघर गेल्या कित्येक वर्षांपासून बाजारपेठेतील जनतेच्या सोयीसाठी आहे त्यामुळे  त्याची सुधारणाही नगर परिषदेने केली होती परंतु जनतेचा विचार न करता  एकाएकी बंद करून येथील ग्राहक व नगर परिषदेच्या गाळे धारकांना व इतर दुकानदारांना अडचणीत टाकले आहे. वास्तविक पाहता हे मुत्रीघर मध्यभागी असल्याने येथे येणाऱ्या ग्राहकांना व दुकानदारांना सोयीचे आहे व नगर परिषदेचे सार्वजनिक सुलभ सौचालय असल्याने त्याची स्वच्छता राखणे हे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम आहे त्यामुळे स्वच्छतेकडे जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे तेव्हा नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासकाने लक्ष घालून मुख्य बाजारपेठेतील बंद केलेले सौचालय पूर्ववत सुरू करावे अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, केळकर, रवींद्र चिडे, कमलेश खडसे, सूरज जाधव, गणेश आत्राम, संदीप गेडाम, भारत कुलसंगे, ध्रुव येरने, महेश चौधरी, रोहित बोबडे, निखिल बोबडे, राजू वाघमारे, किशोर ठाकरे, निखिल गट्टीवार, व बाजारपेठेतील समस्त जनतेनी केली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News