23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीत  प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम 

वणीत  प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम 

* रक्तदान शिबिर,रांगोळी स्पर्धा, शोभायात्रा,संस्कृती कार्यक्रम* 

कार्तिक पटेल वणी –
3 फेब्रुवारी रोज शुक्रवार ला सुतार समाजाचे आराध्य दैवत व शास्त्राचे देव प्रभू विश्वकर्मा यांची जयंती सुतार समाज वणीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षाला रक्तदान शिबिर,रांगोळी स्पर्धा, शोभायात्रा,संस्कृती कार्यक्रम विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात करण्यात येणार आहे.

प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी ला सकाळी 7 वाजता रांगोळी स्पर्धा (शहरातील प्रमुख चौकात) प्रथम,द्वितीय, तृतीय असे रोख पारितोषिक सकाळी 8 : 30 ध्वजारोहण ( अध्यक्ष – अमन बुरडकर यांचे हस्ते ) सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत प्रभू विश्वकर्मा प्रतिमेची शोभायात्रा व कलश यात्रा श्री.महादेव मंदिर सुतार पुरा येथुन निघून नटराज चौक,गांधी चौक,अणे चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,टागोर चौक, सर्वोदय चौक,भगतसिंग चौक,जमा मजीद ,गाडगेबाबा चौक,नटराज चौक,आणि सुतार पुरा येथे समारोप सकाळी 11 वाजता विधिवत श्री.प्रभू विश्वकर्मा पूजन (सौ.संगीता ताई व श्री कवडुजी बुरडकर दाम्पत्याच्या हस्ते) व महिलांकरिता हळदीकुंकू सकाळी 11 ते 4 भव्य रक्तदान शिबिर ( रक्त संकलन – लाईफ लाईन रक्तपेढी ) दुपारी 12 वा श्री .प्रभू विश्वकर्मा जयंती कार्यक्रम प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र वनकर माजी अध्यक्ष सुतार समाज महासंघ, उद्घाटक तेजश्रीताई नितीन भांदककर प्रमुख पाहुणे किसनराव दुधलकर, अमन बुरडकर, मंगला झिलपे,रूपक अंड्रस्कर,लता झिलपे, हर्षल घोंगे,यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे.यात कार्यक्रमात सुतार समाजरत्न पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार दुपारी 3 ते 6 स्नेहभोजन व साय .6 ते 9 सुतार समाजातील लहान मुलामुलींन करीता संस्कृती कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.शहरातील व परिसरातील सुतार समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा मंच यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News