23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

ज्या राज्यात शिक्षण व्यवस्था खालावते तिथे तुरुंगाची संख्या वाढते : आमदार सुधाकर अडबाले

ज्या राज्यात शिक्षण व्यवस्था खालावते तिथे तुरुंगाची संख्या वाढते : आमदार सुधाकर अडबाले

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा भव्य जाहीर सत्कार

कार्तिक पटेल वणी –    नविन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. मात्र त्यासोबतच शिक्षण क्षेत्रातल्या समस्या प्रलंबित ठेवून शिक्षण क्षेत्र खालावण्याचा जो प्रकार सध्या राज्यात सुरु आहे, हा प्रकार असाच सुरू राहिला तर राज्यात तुरुंगाची संख्या वाढवावी लागेल. मात्र असे होवू देणार नाही, प्रसंगी विधानपरीषदेसोबत रस्त्यावरची लढाई सुध्दा लढू पण शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या निकाली काढू, असे नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले म्हणाले.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर तथा जनता परीवार तर्फे नवनिर्वाचित विधानपरिषद शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम आज  श्री लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जीवतोडे, उपाध्यक्ष अंबर जीवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, निवृत्त मुख्याध्यापक प्रा. शाम धोपटे, विजुकटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, सामाजिक कार्यकर्ते मंगल बलकी, दिनेश कष्टी उपस्थित होते.

संस्थेतर्फे यावेळी नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला. सोबतच संस्थेतील सर्व निवृत्त मुख्याध्यापकांचाही संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना आ. सुधाकर अडबाले म्हणाले की अत्यंत गरीब व एकत्र कुटुंब व्यवस्थेतून मी वाढलो, आई वडिलांकडून मी संघटन कौशल्य शिकलो. चांदा शिक्षण प्रसारक मंडळद्वारे मला शिक्षण क्षेत्रात मोठ होता आल. संस्थेची मला नेहमी साथ लाभली. विविध संघटनांनी मला साथ दिली म्हणून हा विजयश्री मिळविता आला. त्या सर्वांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा प्रयत्न राहील. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून डॉ. अशोक जीवतोडे        म्हणाले की, सुधाकर अडबाले यांचा विजय हा संस्थेचा बहुमान वाढविणारा आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील समस्या निकाली लागेल, अशी अपेक्षा आहे. जुन्या पेंशन योजनेसाठी ते कर्मचाऱ्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील लढा तीव्र करु.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा रविकांत वरारकर यांनी मानले .  यावेळी संस्थेचे  मुख्याध्यापक खुसपुरे, बतकी, राजूरकर, पाटील, उपगांलावार, माथणे, बेंडले, डॉ. मसराम, जुआरे, बरडे, डॉ. हेलवटे, मुन, पिंपळकर, रांगणकर, ठक, मोहन गंधारे, शास्त्रकार, अरुण गंधारे, शेख, बोबडे, मेंढे, दिलीप हेपट, भसारकर, बुटले, दुर्गे, बोबडे, काटेखाये, बघेल, जीवतोडे, पोले, पेटकर, कुंभारे, भगत, लांडे, खंडाळकर, उपरे, राहाटे, खिरटकर, काळे, खोके, कानफाडे, कोकुलवार, तसेच सत्कार सोहळ्यास संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी पार पडला .

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News