25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

वणी शहरात वाहतुकीची कोंडी 

वणी शहरात वाहतुकीची कोंडी 

* पायी चालणाऱ्या नागरिकांची गैरसोय  *

उपाययोजना करण्याची गरज    

  सुरेंद्र इखारे वणी –          शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे शहरातील बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या तिन्ही रस्त्यावर व त्या रस्त्यावरील चौक चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना, वयोवृद्धांना ,नागरिकांना व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा वाहतुकीवर नियंत्रण करणाऱ्या संबधीत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.      वणी शहर ही फार मोठी बाजारपेठ आहे या शहरात एम,आय डी सी, कोळशाचे रॅक, कोलडेपो,अनाजांचे भांडार, असल्याने शहरातून फार मोठ्या प्रमाणात जडवाहतुक होत आहे. त्यात बेशिस्त ऑटो , बेशिस्त तरुणांची वाहतूक, रस्त्यावर दुकानदारांची फलके, असल्याने पायी चालणाऱ्या वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुले याना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. व रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यात प्रवासी मिळविण्याच्या नादात ऑटोवाले कट मारून अपघात होत आहे. तरी वाहतूक शाखा त्याकडे दुर्लक्ष करत आहे.    वाहतूक शाखेची गाडी एकतर सकाळी व सायंकाळी दोनदा बाजारपेठेतून पेट्रोलिंग करून निघून जाते परंतु रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायम असते. बेशिस्त वाहतुकीमुळे पायी चालणारे नागरिक त्रस्त झालेले आहे तरी देखील वाहतूक विभाग दुर्लक्ष का करीत आहे . मोठ्या कमानीत , स्टेट बँक, अमृत भवन चौक अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी नियमित होत असते तसेच नगर पालिका प्रशासनाने रस्त्यावर पट्टे मारून जर रस्त्यावरील उभ्या वाहनांचा बंदोबस्त केला  तर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होऊ शकते. परंतु वाहतुकीवर नियंत्रण करण्याचे काम वाहतूक विभागाचे आहे. शहरातील ऑटो चालक, जडवाहतुक धारक राजरोसपणे आपली वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीची समस्या निर्माण करतात. तेव्हा वाहतूक विभागाने अशा वाहनावर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु कारवाई का करत नाही असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. तेव्हा वाहतूक नियंत्रण शाखेने बेशिस्त वाहतुकीवर लक्ष दिल्यास वाहतुकीला शिस्त लागेल अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News