वणीत संत श्री. सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती उत्साहात साजरी.
सुरेंद्र इखारे वणी – येथील श्री. जगन्नाथ महाराज सेवाश्रम येथे संत श्री. सेवालाल महाराज यांची 284 वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वणी व परिसरातील सर्व बंजारा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराज व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून ध्वज पूजन व भोग विधी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संत सेवालाल महाराज वैश्विक मानवतावादी समूहाचे आध्यात्मिक गुरू होते. त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा ,परंपरा ,रूढींना नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून मानवतेचा संदेश समाजाला दिला अश्या या महात्म्याला प्रसंगी अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री देवानंद चव्हाण व प्रा.डॉ.श्री. विनोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तसेच समाजातील काही मुलींनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याचप्रमाणे महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून कार्यक्रमात अधिक उत्साह निर्माण केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.