वणीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने ” भव्य रक्तदान शीबीर”
सुरेंद्र इखारे वणी – येथील निःस्वार्थ सेवा 24 तास रक्तदान सामाजिक ग्रुप वणी यांचे विद्यमाने रक्तपेटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेशोपचार रुग्णालय नागपूर व रक्तगट तपासणी शिबीर( गीतांशु क्लिनिक लैबोरेटरी घोंसा) यांचे सहयोगाने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने ” भव्य रक्तदान शिबिर” दिनांक 19 फेब्रुवारी2023 रोज रविवार ला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौंका जवळील अमोल टी काँर्नरच्या बाजूला आयोजित केले आहे. वणी शहरातील व परिसरातील जनतेनी सर्वात श्रेष्ठ दान “रक्तदान” करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . “क्यो ना खुद की एक पहचान बनाये ,चलो रक्तदान करे और करवाये ” तेव्हा युवक युवतींनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन अमोल धानोरकर,राज चौधरी व शिवचरण प्रतिष्ठान, शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, संभाजी ब्रिगेड, गुढीपाडवा उत्सव मंडळ, स्माईल फाउंडेशन व सर्व शिवभक्त रक्तदाते वणी यांनी केले आहे.