23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

मॅकरून सिबीएसई स्कूलमध्ये एक दिवसीय स्नेहसंमेलन थाटात       

मॅकरून सिबीएसई स्कूलमध्ये एक दिवसीय स्नेहसंमेलन थाटात     

विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध…*

660 कलाकारांचा सहभाग...

सुरेन्द्र इखारे वणी:-     येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई स्कुल वडगाव रोड, वणी येथे भव्य स्वरूपातील व्यासपीठ तयार करून मनाला मोहून टाकणारा “द रिदम ….वे टु एक्स्प्रेस ” वार्षिक महोत्सव उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.          या एकदिवसीय महोत्सव मध्ये सुमारे 660 विदयार्थी कलाकारांनी सहभागी होऊन या कलाविष्काराने पालक व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तसेच अनेक रूढी-परंपरा, अनेक नृत्यकला, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन देखील विद्यार्थ्यांनी घडवले.व अनेक नृत्यात चिमुकल्यांनी ‘आरोग्यदायी आहाराचे महत्त्व’ हा संदेश त्यांच्या कामगिरीद्वारे दिला तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘ बेटी बचाव….. देश बचाओ ‘ यावर भर दिला. तसेच वेगवेगळे संदेशही देण्याचा प्रयत्न त्यांचा कला गुनामधुन दिसून आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  पी.एस.आंबटकर अध्यक्ष, एमएसपीएम ग्रुप हे होते .विशेष अतिथी  प्रिती आंबटकर सचिव, एमएसपीएम ग्रुप ,पीयूष आंबटकर  उपाध्यक्ष एमएसपीएम ग्रुप ,प्रांजली रघटाटे (व्यवस्थापन,एमएसपीएम ग्रुप),अंकिता आंबटकर, (संचालक,एमएसपीएम ग्रुप),पायल आंबटकर,(संचालक, सोमय्या ए.एम. कॉलेज),श्रीमती शोभना मॅडम विशेष अतिथी म्हणून फैयाज अहमद,(प्राचार्य,PMC Chd.), जमीर शेख (प्राचार्य, सोमय्या पॉली. सीएचडी.),राजेश बिसेन(रजिस्ट्रार, एमएसपीएम सीएचडी.)मनीष हिवरे (समन्वयक, ITI),राजदा सिद्दीकी(व्यवस्थापक,भद्रावती), संजय दामले (आयटीआई, मुख्यध्यापक)कन्हैया तिवारी, (एचओडी,सोमय्या करिअर वणी) हे सर्व उपस्थित होते.या कार्यक्रमच्या यशस्वितेकरीता शाळेतील मुख्यद्यापिका शोभना तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाचा शेवट शहीदांन श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.

[विविध राज्यांतील नृत्यप्रकारांचा अविष्कार :-
‘नृत्य तरंग’ मध्ये विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील नृत्यांचे सादरीकरण केले. मुलांना अनेक राज्यांच्या विविध कलांची माहिती या विषयांतर्गत सांगण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात, अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिसा, मिझोरम, केरळ, पंजाब आणि इतरही राज्यांचा समावेश होता. भारतीय संस्कृती, परंपरा, बोलीभाषा, सण आणि त्यांचा पोशाख याचबरोबर विविध राज्यांची अधिक माहितीही विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ]

[नृत्यातून जपला आदिवासींचा धिकारी सांस्कृतिक वारसा:- वनबंधू, नृत्यतरंग, कृष्णकथा अशा तीन विषयांवर न्ववादी आधारलेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन माच्या केले. वनबंधू या विषयांतर्गत मुलांना आदिवासी भागांतील चपाटे जीवनमान, संस्कृती आणि परंपरेचे संरक्षण तसेच आदिवासींचा सांस्कृतिक वारसा, संवर्धन आणि प्रोत्साहन यांचे महत्त्व जाणून घेत, विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी नृत्य सादर केले.]

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News