25 C
New York
Saturday, July 13, 2024

वणीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती  ही शासकीय कार्यालयाला “राज्य गीताचे” फलक देऊन साजरी         

वणीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती  ही शासकीय कार्यालयाला “राज्य गीताचे” फलक देऊन साजरी       

सुरेंद्र इखारे वणी येथील  रॉयल फाउंडेशन  व शिवचरण प्रतिष्ठान यांनी  छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती ही ” गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाल्याने सर्व शासकीय कार्यालयाला ” राज्यगीताचे फलक”  देऊन साजरी करण्यात आली आहे.            दरवर्षी ही संस्था  आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी आणि कल्पकतेने शिवजयंती साजरी करत असते मात्र या वर्षी अशाच एका आदर्श उपक्रमाने रॉयल फाउंडेशन वणीचे अध्यक्ष ॲड. निलेश म. चौधरी आणि उपााध्यक्ष डॉ. रोहित वनकर यांचे कल्पनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साजरी करण्याचे ठरविले आणि कार्यक्रमाला मूर्त रूप दिले.
महाराष्ट्र सरकारने या वर्षी शिवजयंती पासून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला ‘राज्यगीत’ चा दर्जा दिला. त्यामुळे या गीताला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे या गीताप्रती असलेला आदर आणि अभिमान आपणा सर्वांना आहे आणि येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मुखात हे गीत यावे या करिता रॉयल फाउंडेशन वणी आणि शिवचरण प्रतिष्ठान वणी यांनी या राज्य गीताचे 3 x 2 फुटाचे फलक तयार करून वणी शहरातील सर्व शासकीय – निमशासकीय कार्यालय, वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय, मान्यवर व्यक्ती, वित्तीय संस्था, दवाखाने यांना सस्नेह भेट दिली.त्यात वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस याना सुध्दा राज्यगीत फलक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे आणि सर्व मान्यवरांनी त्यांना त्यांचे पुढील सामाजिक कार्याकरिता शुभेच्छा सुद्धा दिल्या आहे
या उपक्रमासाठी रॉयल फाउंडेशन वणी आणि शिवचरण प्रतिष्ठान वणी चे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहे. .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News