विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ पदाधिकाऱ्यांची
शिक्षण उपसंचालक कार्यालयात सभा संपन्न
अनेक सामुहिक व वैयक्तिक समस्यांचे निराकरण
सुरेंद्र इखारे वणी। :- नुकतीच अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयात शिक्षण उपसंचालक मा. शिवलिंग पटवे यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार मा. व्ही.यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार मा. सुधाकरराव अडबाले व विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष मा. एस.जी. बरडे यांचे प्रमुख उपस्थितीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभागातील प्रांतीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्यवाह व समस्याग्रस्त शिक्षक यांचें उपस्थितीत सहविचार सभा संपन्न झाली.
या सहविचार सभेमध्ये मा.शिवलिंग पटवे साहेब यांनी मा. व्ही.यू. डायगव्हाणे, मा. सुधाकरराव अडबाले, मा. एस.जी. बरडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अमरावती विभागातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात येऊन शिक्षकांच्या सामुहिक व वैयक्तिक समस्यांची तात्काळ दखल घेऊन निराकरण केले. सहविचार सभेमध्ये कार्यरत, सेवानिवृत्त व DCPS / NPS धारक शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोग थकबाकीचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता, भविष्य निर्वाह निधी व DCPS हिशेब चिठ्ठ्या, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, सर्व प्रकारची थकबाकी, वरिष्ठ / निवड श्रेणी प्रस्ताव, संचमान्यता, वेतन बंद करून वेतनापासून वंचित ठेवणे, कायम विनाअनुदानित शाळेतील सेवा वरिष्ठ श्रेणीसाठी ग्राह्य धरणे, भनिनी परतावा / नापरतावा, अंतिम प्रदान व रजा रोखीकरण, वेतनेतर अनुदान, सुवर्ण महोत्सव आदिवासी शिष्यवृत्ती, राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS), वेतन देयक व प्रस्तावाला पोच न देणे, चेकलिस्टमध्ये असमानता असणे, कार्यालयीन भ्रष्टाचार, शिक्षण सेवक काळातील अर्जित रजा, अनुकंपा तत्वावरील प्रलंबित प्रकरणे, शिक्षण सेवक मानधन वाढ, मुळ व दुय्यम सेवा पुस्तिका, खाते मान्यता, पर्यवेक्षक पदोन्नती वेतन निश्चिती, मॅट्रिक व पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती लेखापरीक्षण आक्षेप, कर्मचारी पदोन्नती, शालार्थ, अधिसंख्य पदे, BLO नियुक्ती, आर्थिक व प्रशासकीय अधिकार आदि अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या सहविचार सभेला सहा. संचालक मा. रविंद्र वाणी, प्रभारी शिक्षण उपनिरीक्षक मा. अनिल कोल्हे, अमरावती विभागातील सर्व मा.लेखाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक मा.शिक्षणाधिकारी व मा. वेतन अधिक्षक उपस्थित होते तसेच प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे, जयदीप सोनखासकर, प्रांतीय कोषाध्यक्ष अविनाश बडे, अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुनील खाडे, विमाशिसंघ अमरावती जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, जिल्हा कार्यवाह जयंत सराटकर, अमरावती महानगर अध्यक्ष अतुल देशमुख, महानगर कार्यवाह अरविंद चौधरी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशपाक खान, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे, वाशिम जिल्हा कार्यवाह कुलदीप बदर, बुलढाणा माजी विभागीय कार्यवाह बाबाराव कडू, जिल्हाध्यक्ष विष्णू अवचार, उपाध्यक्ष अकिल तांबोळी, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे, मनोज जिरापूरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद मेश्राम, पवन बन, अमरावती जिल्हा सहकार्यवाह गजेंद्र शेंडे, निळकंठ गणवीर, हरिभाऊ वानखडे, गजानन हिवरकर व समस्याग्रस्त शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.