आंबेडकर भवनाच्या संघर्षासाठी वकील संघटनेचा पाठिंबा
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:- डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव समितीच्या वतीने आयोजित महिलांच्या लक्षवेधी धरणे कार्यक्रमाच्या 41 दिवशी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने अॅड. रोशन बागडे यांच्या नेतृत्वाखाली सभामंडपाला 35 वकिलांनी भेट दिली व या आंदोलनात आम्ही सहभागी आहोत असे ग्वाही दिली.डाॅ. आंबेडकर भवनाच्या संघर्षासाठी वकिलांची संघटना सज्ज असून न्यायालयीन लढाईसाठी आमची पूर्ण तयारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासंबंधीची वकिलाची बैठक लवकरच घेण्यात येणार असून संविधानात्मक मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा आमचा निर्धार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी कृती समितीच्या कार्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. आजच्या सभा मंडपात कृती समितीचे जेष्ठ सदस्य बाळू घरडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सरोज आगलावे, तक्षशिला वाघदरे, पुष्पाताई बौद्ध, डॉ. सरोज डांगे, उषाताई बौद्ध, सुषमा कळमकर, ज्योती आवळे, सुधीर वासे, धनराज डहाट, राजेश गजघाटे, जनार्दन मून आणि इतर मान्यवरांनी सहभाग दिला.