25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

विजय काका यांचे हस्ते ॲड. अरुण खानझोडे यांच्याThought For Today पुस्तकाचे विमोचन 

विजय काका यांचे हस्ते ॲड. अरुण खानझोडे यांच्याThought For Today पुस्तकाचे विमोचन 

“खडतर जीवनाच्या प्रवासातून आयुष्याला लाभलेली गुरुकृपा” 

पुस्तकातून विचारांचे अलौकीकत्व अधोरेखित  

           सुरेन्द्र इखारे वणी  :-  नुकतेच  वणी येथील ॲड. अरुण खानझोडे यांच्या राहते घरातील सभागृहात अत्यंत कौटुंबिक स्वरूपाच्या कार्यक्रमात दत्त संप्रदायसंवर्धक समर्थ सद्गुरु श्री. विजय काका पोफळी महाराज यांच्या पावन हस्ते ॲड. अरुण विनायक खानझोडे यांच्या Thought For Today या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.         याप्रसंगी व्यासपीठावर श्री. विजय काका पोफळी यांच्यासह वेदमूर्ती भूषण आर्वीकर, विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड, लेखक अरुण खानझोडे तथा सौ. माणिक खानझोडे उपस्थित होते.  यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लेखकांचे सुपुत्र प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी आई-वडिलांच्या खडतर जीवनाचा मागोवा घेत या विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी सांभाळलेले स्वत्व आणि पुढील पिढीला संक्रमित केलेले संस्कार याविषयी गौरवोद्गार काढले  तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर  विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार प्रकाशित करण्याच्या योग्यतेचा असायला हवा असे म्हणत मानवी जीवनातील विचारांचे अलौकिकत्व स्पष्ट करून पुस्तकाच्या उपयोगित्वाला अधोरेखित केले.   लेखकांच्या अमृत महोत्सवानिमित्त या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याने याप्रसंगी करण्यात आलेल्या ऐंद्री शांतीचे स्वरूप आणि महत्त्व सांगत वेदमूर्ती भूषण गुरुजींनी श्रोत्यांच्या ज्ञानात शास्त्रीय भर घातली. आपल्या अत्यंत खुसखुशीत मनोवेधक शैलीतील मनोगतामध्ये लेखकांनी आयुष्यात लाभलेली गुरुकृपा, चांगल्या लोकांची संगती, स्वतःच्या कर्माप्रती असणारी निष्ठा या जीवन पैलूंना स्पष्ट करीत भावी पिढीने वाचावे म्हणून पुस्तक मुद्दाम इंग्रजीत लिहीत आहे अशी भावना व्यक्त केली. श्री. विजय काका पोफळी यांनी जीवनातील कर्माचे महत्त्व, अमृतत्वाच्या शोधासाठी येथून पुढील जीवन सत्कारणी लावण्याची भारतीय भूमिका अशा विविध विषयांवर आशीर्वचन प्रदान केले.  या पुस्तकास विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव, इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ अभिजित अणे यांची प्रस्तावना प्राप्त झाली आहे.  या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मुग्धा खानझोडे यांनी केले तर आभार सौ. प्रज्ञा (श्रुती) फडणवीस यांनी मानले .या कार्यक्रमासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले . 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News