नगर पालिका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जयंत सोनटक्के तर सचिवपदी जयप्रकाश सूर्यवंशी अविरोध
सुरेंद्र इखारे वणी :- येथील नगर पालीका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जयंत सोनटक्के तर सचिवपदी जयप्रकाश सूर्यवंशी यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. वणी नगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली असून . या निवडणुकीत परिवर्तन पँनलचे भोलेश्वर ताराचंद, किशोर चौधरी, प्रेमदास डंबारे, विनोद चव्हाण, मुरलीधर ,कूत्तरमारे, जयप्रकाश सूर्यवंशी, सुनीता जकाते, वंदना परसावर, जयंत सोनटक्के , संजय पवार हे सर्व उमेदवार या निवडणुकीत निवडून येऊन यश संपादन केले आहे. ही निवडणूक जयंत सोनटक्के यांच्या नेतृत्वात पॅनलचा एकतर्फी दनदनीत विजय झाला.
आज दि. 6-3-2023 रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होती. या निवडणुकीत अध्यक्षपदी जयंत सोनटक्के , उपाध्यक्षपदी सौ वंदना परसावत व सचिवपदी जयप्रकाश सूर्यवंशी यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्री अनिल कांबळे , किशोर परसावार, श्री पालवे सर, श्री शिंदे सर, श्री जोगी सर यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षपदी श्री जयंत सोनटक्के यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व संपूर्ण पॅनलचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे . निवडीचे संपूर्ण श्रेय नगर पालिकेच्या सर्व सभासद सदस्यांना देण्यात येत आहे.