Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedप्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणमध्ये स्त्रीचा फार मोठा हात आहे. - डॉ. प्रशांत नारनवरे

प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणमध्ये स्त्रीचा फार मोठा हात आहे. – डॉ. प्रशांत नारनवरे

प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणमध्ये स्त्रीचा फार मोठा हात आहे. – डॉ. प्रशांत नारनवरे

नागपूर प्रतिनिधी जयंत साठे      :-    जिथे महिलांच्या हातात सत्ता असते तो देश ते क्षेत्र नेहमीच प्रगतीशील असतो. सत्ता केवळ पुरुषांची असावी असा काहीसा गैरसमज असतो. परंतु स्त्रीच्या हाती सत्ता असली तर ती त्या संधीच सोनच करते व आपल्या क्षेत्रात आणखी आणखी प्रगती करुन आपल्या क्षेत्राला वरच्या स्थानावर नेऊन ठेवते. जिथे स्त्रीला मानच नसेल ते शासन सर्वसमावेशक आहे हे आपण कसे म्हणू शकतो. आई ज्याप्रमाणे कुटूंबाची जोपासना करते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणमध्ये स्त्रीचा फार मोठा हात असतो असे डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे समाज कल्याण विभाग नागपूरद्वारा जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर उद्घाटक डॉ. प्रियंका नारनवरे, आयपीएस, कमांडन्ट एसआरपीएफ व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. छाया जनबंधू, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर व सुरेंद्र पवार, उपायुक्त, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर, सुरेश पेंदाम जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.चंद्रपूर व अतुल वासनिक, सहाय्यक संचालक वित्त व लेखा, कार्यालय प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आई पहिला गुरु असतो आपल्या मुलांना ती संस्कारीत करते. याप्रमाणे संपूर्ण जग संस्कारीत करण्याची जबाबदारी ही आई पार पाडत असते, म्हणून प्रत्येकांच्या आयुष्यात महिलांची भूमिका फार महत्त्वाची असते.असे उद्घाटक म्हणून डॉ. प्रियंका नारनवरे यांनी प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर कार्यक्रमादरम्यान डॉ. प्रियंका नारनवरे व डॉ. छाया जनबंधू यांच्या कर्तृत्वाला सलाम करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. स्त्री पुरुष समानता सर्व देशभर पाळली जाते त्यामुळे जागतिक स्तरावरील महिला दिन आज संपूर्ण देशभर साजरा केला जातो. असे त्यांनी आपल्या प्रास्ताविक म्हटले. तर सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. सदर कार्यक्रमाचे संचालन विशाखा गणोरकर तर आभार प्रदर्शन अंजली चिवंडे, यांनी केले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments