सुमनताई ढवळे याना भावपूर्ण श्रद्धांजली
सुरेंद्र इखारे वणी – साधनकरवाडी चिखलगाव येथील माजी सेवानिवृत्त शिक्षक वामनरावजी ढवळे यांच्या पत्नी सुमनताई ढवळे यांचे वयाचे 76 व्या वर्षी दिनांक 8 मार्च 2023 रोज बुधवारला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांचे पाठीमागे पती,व मुलगा राजेश,प्रमोद ,आशिष ही तीन मुले ,सुना , नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. आज दिनांक 9 मार्च 2023 रोज गुरुवारला दुपारी 12 वाजता चिखलगाव येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी मोक्षधाम येथील अंत्यसंस्कार सभागृहात दादाजी कालर सर यांचे अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली याप्रसंगी पंचायत समिती वणीचे सभापती संजय पिंपळशेंडे ,संदीप शेरकी, मोरेश्वर झिले यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष दादाजी कालर यांनी सुमनताई ढवळे यांच्या मनमिळाऊ स्वभाव जीवनावर प्रकाश टाकून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या शोकसभेचे सूत्रसंचालन विलास शेरकी यांनी केले तर भावपूर्ण श्रद्धांजलीला परिसरातील समाज बांधव, डब्ल्यू सी एल चे कर्मचारी राजकीय नेते आप्तसकीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुमनताई ढवळे याना सभागृहात दोन मिनिटे मौन बाळगून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.