“एकच मिशन जुनी पेन्शन ” कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप
सुरेंद्र इखारे वणी – येथील पंचायत समिती सभापती निवासा समोर पेंडाल टाकून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी वणी तालुक्यातील कर्मचारी, शिक्षक आज पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहे. या संपामध्ये शासकीय निमशासकीय ,खासगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग आहे. कारण यापूर्वी वणी तालुक्यातील हजारो कर्मचारी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्याने जुनी पेन्शन योजनेचा विराट मोर्चा हा शासनाला धडकी भरणारा होता. त्यामुळे आजपासून जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे त्याचा परिणाम परिक्षांवर होणार असल्याने सरकारचा ताण वाढला आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्वच शिक्षक संघटना ,यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटना शाखा वणी, अशा विविध संघटनां बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत त्यामुळे सर्व सेवा ठप्प होण्याची चिन्हे दिसून येत आहे दहावी व बारावीचे बोर्डाचे पेपर सुरू असून 25 मार्च पर्यंत आहे त्यात मूल्यमापन असल्याने प्रभावित होण्याची शक्यता आहे त्यामुळे या संपाचा सर्वाधिक फटका परीक्षेला बसण्याची शक्यता आहे यामध्ये वणी तालुक्यातील अनेक शाळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग नोंदविला आहे यामध्ये किशोर बोढे, संतोष म्हसे, देवानंद गेडाम, इंगळे, बच्चेवार, दगडी, विलास पारखी, राकेश वरहाटे, प्रीतेश लखामपुरे, राजश्री गोखरे, सचिन धुमने, जयंत मेश्राम, राजू काकडे, रमेश मुन, संतोष बेलेकार, वर्षा पिंपळशेंडे या सारखी असंख्य कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाली आहे.