आंबेडकर भवनाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करू – विनोद सिंग
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:- अंबाझरी तलाव परिसरातील 2० एकर जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्या भूमाफियांविरुद्ध कठोर कारवाई करून त्याच जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी महिलांचे लक्षवेधी धरणे आज ५७ दिवशीही सुरू होते. यावेळी आज दिनांक १७ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर गजभिये तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय किसान मंचचे अध्यक्ष विनोद सिंग डॉ. सरोज आगेलावे, उषा बौद्ध उपस्थित होते.
भारतीय किसान मंच चे अध्यक्ष विनोद सिंग म्हणाले की, आमच्या सहकारी पक्षाचे खासदार यांच्या वतीने भारतीय संसदेमध्ये हा आंबेडकर भवनाचा प्रश्न उचलू आणि याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, वीस एकर जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त करणाऱ्या भूमाफियाविरुद्ध जोपर्यंत कठोर कारवाई होत नाहीत तोपर्यंत आम्ही किसान आंदोलनात हा मुद्दा रेटून धरून असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी किशोर गजभिये, प्रा डॉ सरोज आगलावे, पुष्पाताई बौद्ध यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना किशोर गजभिये म्हणाले की, हे आंदोलन आस्था, स्वाभिमान, अस्मितेचे आहे. ओबीसींचे आंदोलन केवळ जनगणना व आक्षणापर्यंत सिमित झाली आहे.२० एकर जागेत महानगर पालिकेने स्मारक बांधले. महाराष्ट्र सरकारने ही जागा पर्यटन विकास महामंडळाला दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसर बचाव कृती समिती च्या वतीने आयोजित महिलांच्या लक्षवेधी धरणे आंदोलनाचा ५७ व्या दिवशी ही घोषणा त्यांनीं केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रताप गोस्वामी,तर आभार जयंत साठे यांनी मानले.
यावेळी राहुल परुळकर, प्रा.डाॅ. सरोज डांगे, भीमराव लोखंडे, सुधीर वासे,चंद्रभान कवाडे, यशवंत इंगोले, रमेश पाटील, अशोक डोंगरे,अरूण कापसे,मोहन गजभिये,आदी उपस्थित होते.