23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीच्या जैताई मंदिरात चैत्र नवरात्रात वैविध्यपूर्ण कार्यक्रम

वणीच्या जैताई मंदिरात चैत्र नवरात्रात वैविध्यपूर्ण कार्यक्रम

सुरेन्द्र इखारे वणी :-  येथील विदर्भ विख्यात जैताई मंदिरात दि. २२ ते ३० मार्च पर्यंत संपन्न होणाऱ्या चैत्र नवरात्रात
वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २२ मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी
श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राच्या वतीने
सांजपाडवा हा सुमधुर संगीताचा कार्यक्रम आयोजित आहे. दि२३ मार्चला विद्यावाचस्पती
प्रा. स्वानंद पुंड यांचे नीतिशतकम् या विषयावरचे गाजलेले व्याख्यान संस्कृत भारतीच्या सौजन्याने ऐकण्याची संधी शहरवासीयांना प्राप्त झाली आहे. दि। २५
मार्च रोजी नुपूर नाट्यनिकेतन अकादमी नागपूरच्या माध्यमातून सौ. सूचना बंगाले प्रभू रामचंद्रांवरील गीते न्रुत्यांद्वारा सादर करणार आहे. दि. २६ मार्चला नागपूर येथील डॉ. विवेक देशपांडे यांचे कीर्तन आयोजित आहे. संगीत सौभद्र नाटकातील एक प्रवेश नागपूर येथील नारायण जोशी , रेखा शुक्ला व उज्वला अंधारे
दि. २७ मार्च रोजी सादर करणार आहेत. दि. २८ मार्चला सागर झेप प्रस्तुत हास्यजत्रा कार्यक्रम होणार आहे.संस्कार भारती वणी
प्रस्तुत अभंगवाणी कार्यक्रमाने नवरात्रातील कार्यक्रमांची सुरेल सांगता होणार आहे.
सर्वच कार्यक्रम रोज रात्री ७ ते ९ या वेळात जैताई मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहेत. बंधुभगिनींनी बहुसंख्येने या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे. .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News