23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

खड्डाविरहित वणी करण्याचा आपला प्रयत्न – आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  

खड्डाविरहित वणी करण्याचा आपला प्रयत्न – आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार   

 वणीत आगामी सण उत्सव संबंधात शांतता समितीची सभा   

सुरेंद्र इखारे वणी –  खरं तर वणी शांतच आहे.  परंतु अनेकांचे पहिले पासूनचे जे प्रश्न आहे  तेच प्रश्न त्याच समस्या आजपर्यंत सुरू आहे अनेकांनी या समस्यांच्या संदर्भात बोलले आहे  यावेळी सर्वांना आश्वासन देतो भविष्यात जेव्हा यापुढे सण उत्सव व त्या पुढच्या सण उत्सवात वणी शहरात एकही खड्डा दिसणार नाही ज्या ज्या रस्त्यांनी सण उत्सवातील रॅली जाईल तेव्हा रस्त्याची तक्रार राहणार नाही येत्या वर्षभरात सर्व रस्ते सिमेंटचे होणार आहे असे आश्वासन देत खडाविरहित वणी करण्याचा आपला प्रयत्न राहील असे मत व्यक्त केले.   वणी येथील  महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्या सयुक्तविद्यमाणे आगामी सण उत्सवाचे संबंधात  दिनांक 28 मार्च 2023 रोज मंगळवारला सायंकाळी 7.00 वाजता वसंत जिनिग हॉल मध्ये शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, तहसीलदार निखिल धुळधर, यवतमाळ चे उपविभागीय पोलीस अधिकारी गोटे साहेब, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, गटविकास अधिकारी गजजलवार, उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सभेचे प्रास्ताविक ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी केले तसेच उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांनी शांततेचा भंग होत असताना आलेला अनुभवातून जनतेनं सुद्धा सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  तसेच शांतता समितीचे सदस्य निलिमा काळे, राजाभाऊ पाथरडकर,रामनवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर, मंगल तेलंग, नारायण गोडे, रजाक पठाण, किरणताई देरकर यांनी वणी शहराच्या शांततेचे गुणगान केले परंतु शहरातील सुविधांच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात  प्रशासनाविषयी नाराजगी व्यक्त केली आहे.   पुढे आमदार म्हणाले या दोनदिवसात शहरातील  सण उत्सवातील समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी  तसेच माझी अतिशय प्रामाणिक भूमिका असते मी आमदार म्हणून बोलत नाही वणीकर जनता अतिशय सुजाण आहे  तुमचे मतभेद असते मनभेद न करता सामोपचाराने आपुलकीच्या भावनेने आपले प्रश्न सोडवतात असे मत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बोरकुटे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मानले . शांतता समितीच्या सभेसाठी वणी उपविभागतिल पोलीस अधिकारी पुरी साहेब, जाधव साहेब, पाटील साहेब, गजानन करेवाड साहेब, पोलीस कर्मचारी उपनिरीक्षक शेखर वांढरे, आत्राम, प्रदीप ठाकरे, संजय आत्राम, व समस्त पोलीस शिपायांनी सहकार्य केले .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News