दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय धम्म परिषद संपन्न
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी -: बुद्ध धम्माच्या सुत्तपिटक व विनयपिटका नंतर सर्वात महत्त्वाचे असलेले अभिधम्मपिटक व त्याच्या विविध पैलूवर संघकाया फाउंडेशनच्या माध्यमातून दीक्षाभूमी च्या ऑडिटोरियम सभागृह मध्ये पाचवी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद नुकतीच संपन्न झाली.
या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत बौद्धधम्म व विज्ञान, बौद्धधम्म व मानसिक स्वास्थ, अभिधम्म आणि प्रज्ञा, अभिधम्मातील मनोविज्ञान, अभिधम्मात कर्म आणि पूर्णभव, अभीधम्मातील व्यक्तींचे विश्लेषण, अभिधम्म आणि विपश्यना, बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे मिशन आदि विषयावर दोन सत्रात दिवसभर चर्चा करण्यात आली. सोबतच पीएच डी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी यावेळी आपले पेपर वाचन केले.
अभिधम्म च्या विषयावर पालीचे तज्ञ डॉ. बालचंद्र खांडेकर, पालीच्या माजी विभाग प्रमुख डॉ. मालती साखरे, मुंबई विद्यापीठातील पाली विभाग प्रमुख डॉ. शालिनी बागडे, डॉ. मनीषा गजभिये, डॉ. सुशांत मेश्राम, डॉ. मिथुन कुमार, भंते विचियन, भंते प्रशिल रत्न यांनी तसेच साचीच्या सोनाली बारमाटे, दिल्लीचे सुदीप कुमार, औरंगाबादच्या पुष्पा गायकवाड, भन्ते शुभमचित्त, महा नागरत्न जुमडे, ऍड लालदेव नंदेश्वर आदींनी आपली मते पेपर च्या माध्यमातून व्यक्त केली.
याप्रसंगी पाली भाषेच्या योगदाना बद्दल डॉ. बालचंद्र खांडेकर यांना पालीरत्न, डॉ. मालती साखरे यांना पालीकोविद, भंते विचीयन यांना बुद्धरत्न, डॉ. शालिनी बागडे व मनीषा गजभिये यांना पालीपुष्प, डॉ. प्रदीप आगलावे यांना भिमरत्न तसेच मानव समाजातील विविध प्रकारच्या योगदानाबद्दल विजय दर्डा, डॉ. सुशांत मेश्राम, उत्तम शेवडे व मिथुन कुमार यांना गेस्ट ऑफ ऑनर चे स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच भंते अभय, भन्ते महेंद्र, डॉ. रेखा बडोले, डॉ. प्रतिभा गेडाम, डॉ. बिना नगरारे, डॉ. रूपा वालदे, डॉ. अनिता हाडके, डॉ. तुळसा डोंगरे, डॉ. कल्पना मून, डॉ. ज्वाला डोहाने, योगिता इंगळे, संदीप शंभरकर, कमलेश चहांदे, अमित गडपायले आदीं धम्मप्रचार करणाऱ्यांना धम्मदूत अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ भालचंद्र खांडेकर होते. परिषदेचे उद्घाटन लोकमत मीडिया ग्रुपचे प्रमुख विजय दर्डा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे आयोजक भंते प्रशिल रत्न यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेखा बडोले व अश्विनी पाटील यांनी तर कार्यक्रमाचा समारोप इंजि. पी. एस. खोब्रागडे यांनी केला.