सुशगंगा पब्लिक स्कुलमध्ये JEE आणि NEET च्या तयारीसाठी फाउंडेशन कोर्स
सुरेंद्र इखारे वणी – शहरातील स्वावलंबी शिक्षण संस्था संचालित सुशगंगा पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET आणि JEE च्या तयारीसाठी फाउंडेशन बॅच सुरू करण्यात आली आहे. सुशगंगा पब्लिक स्कुलचे प्राचार्य प्रवीण दुबे यांनी म्हटले की अनेक विद्यार्थी आणि पालक निर्णय घेण्यास विलंब करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना नीट आणि जेईई मध्ये यश मिळण्यासाठी अडचणी येत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी सहाव्या इयत्तेपासूनच नीट आणि जेईई ची तयारी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ज्या मुलांचे सुरुवातीचे शिक्षण चांगले होते त्यांचा निकाल भविष्यात चांगला लागतो ते पुढे म्हणाले की येथील शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात तयार करण्याचा प्रयत्न करतात ज्यांचा सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येईल तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रदीपजी बोनगीरवार यांनी सांगितले की ही संस्था संकल्पनावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना चांगला निकाल देण्यासाठी कटिबद्ध आहे तेव्हा लवकरात लवकर मुलांनी नोंदणी करून JEE &NEET मध्ये यश मिळवावे असे आवाहन संस्थाध्यक्ष प्रदीप बोनगीरवार यांनी परिसरातील विद्यार्थी व पालकांना केले आहे.