25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

सन 2022-23 सत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

सन 2022-23 सत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

जयंत साठे नागपूर –भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावर अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता दि. 30 एप्रिल, 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर केलेले नाही असे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहु नये म्हणून अशा अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने अंतिम मुदतवाढ दिलेली आहे. नागपूर विभागातील महाविद्यालयामध्ये सन 2022-23 मध्येप्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी सन 2021-22 व 2022-23 शैक्षणिक सत्रातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत असे आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News