25 C
New York
Saturday, July 13, 2024

लोकमान्य टिळक महाविद्यालयात गजानन कासावार यांचा सत्कार.

लोकमान्य टिळक महाविद्यालयात गजानन कासावार यांचा सत्कार.

सुरेन्द्र इखारे वणी :–   संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नियुक्त सभासद म्हणून वणी येथील राज्यस्तरीयआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्राप्त पत्रकार तथा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्राप्त विचारवंत गजानन तुकाराम कासावार यांचा शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात संस्थेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष रमेश बोहरा, सचिव ॲड.लक्ष्मण भेदी सहसचिव अशोक सोनटक्के तथा मान्यवरांच्या उपस्थितीत हृद्य सत्कार करण्यात आला.
ही घटना आपल्या संपूर्ण वणी शहराच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आहे. असा सन्मान मिळणे हे खरोखरच अत्यंत दुर्मिळ असून आजवरच्या कार्याचा हा सगळ्यात मोठा गौरव आहे असे विचार प्रास्ताविकात डॉ. अभिजित अणे यांनी व्यक्त केले.
मी माझ्या आयुष्यात जमेल ते प्रत्येक सकारात्मक कार्य करण्यासाठी शक्य तितका प्रयास केला. त्याचेच हे फळ आहे असे मनोगत व्यक्त करीत सत्कारमूर्ती श्री गजानन कासावार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधन करताना युवकांच्या भरारीवरच देशाची भरारी अवलंबून असल्यामुळे आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक कार्यामध्ये आपला सहभाग असेल यासाठी प्रयत्न करावे असे संबोधन केले.
त्यांच्या निमित्ताने हा वणी नगरीलाच प्राप्त झालेला अपूर्व गौरव आहे असे मत उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News