नक्षलग्रस्त भागातील नगरपरिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नक्षलग्रस्त भत्ता द्या.- मा.ॲड श्री किरणराव सरनाईक.
🔹*मा. श्री दीपकजी केसरकर साहेब यांना विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारून केली मागणी*.🔸
सुरेन्द्र इखारे वणी:- महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात सेवा पुरविणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने अतिरिक्त भत्ता दिला जातो. नक्षलग्रस्त भागात हे कर्मचारी फार मोठी जोखीम पत्करून सेवा देत असतात. नगरपरिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. शासन नियमानुसार तसेच वेतन आयोगानुसार वेळोवेळी या भत्त्यांमध्ये आवश्यक तो बदल करणे अपेक्षित असते. सद्यस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे लाभ मिळालेले आहेत.परंतु नक्षलग्रस्त भत्ता हा पाचव्या वेतन आयोगाच्या दरानुसारच अदा केला जातो. हा एक प्रकारचा या कर्मचाऱ्यांवर आर्थिक अन्याय असून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मा. श्री किरण सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून या नगरपरिषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या दराने नक्षलग्रस्त भत्ता अदा करण्याची मागणी केली आहे.