संगीत सौभद्र या नाटकातील श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीचा प्रसंग
सादरीकरणाला श्रोत्यांची कौतुकाची थाप
सुरेन्द्र इखारे वणी:-
येथील जैताई नवरात्र उत्सवानिमित्त जागतिक रंगभूमी दिनी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र या प्रसिद्ध नाटकाच्या एका अंकाचे सादरीकरनात श्रीकृष्ण सुदामा भेटीचा प्रसंग साकारण्यात आला असून विशेष म्हणजे सुदामाच्या भूमिकेत वणीचे जेष्ठ कलावंत अशोकजी सोनटक्के यांनी हुबेहूब साकारला असल्याने श्रोत्यांनी केले कौतुक . संगीत सौभद्र या नाटकाचे निर्माता, संपादक, दिग्दर्शक नारायण जोशी यांच्या संचाने नाटकाच्या अंकाचे सादरीकरण केले आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले संगीत सौभद्र ही मराठी भाषेतील अजरामर कलाकृती आहे. या पूर्ण कलाकृतीचे संपादन करून एक तासाचा एक अंक नारायण जोशी यांनी बसवून या ठिकाणी सादर केला. या नाटीकेत श्रीकृष्णांची प्रमुख भूमिका नारायणराव जोशी यांनी अतिशय सुंदतरित्या साकारली. या संगीत नाटीकेच्या सूत्रधार प्रा. उज्वला अंधारे या होत्या. रुख्मिनीच्या भूमिकेत रेखा शुक्ला यांनी सशक्त अभिनय केला. या नाटीकेच्या सहायक निर्मात्या राजलक्ष्मी जोशी या होत्या.
या नाटीकेच्या सुरुवातीला मित्र सुदामाच्या भूमिकेत येथील नाट्य कलावंत अशोक सोनटक्के येऊन श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीचा प्रसंग उभा करण्यात आला होता. या प्रसंगी तबल्याची साथ अभिलाष राजूरकर यांनी दिली. संवादिनीवर अरुण दिवे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थान समितीचे सचिव माधव सरपटवार यांनी केले. आभार मंदिराचे विश्वस्त प्रा
चंद्रकांत अणे यांनी मानले.