25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

माझ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले – दयाशंकर तिवारी   

माझ्या महाराष्ट्रत छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले – दयाशंकर तिवारी     

सुरेंद्र इखारे वणी :–    “होय मी सावरकर” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवासाठी एक गौरव यात्रा काढून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला संबोधन करताना  प्रमुख वक्ते म्हणाले ” कुठे स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे राहुल ज्यांची ओळख पप्पू आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुलना होऊच शकत नाही. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरणं देत असताना म्हणाले लोकमान्य टिळक एका कार्यक्रमात वक्ता म्हणून उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वातंत्र्यवीर सावरकर करत असताना  तेव्हा लोकमान्य टिळकांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडले जेव्हा मी विनायकाचे भाषण ऐकत होतो तेव्हा त्याच्या हलकर मनामध्ये कुटकुटकर राष्ट्रभक्तीची ज्वाला दिसून येत होती तेव्हा मला वाटलं “माझ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी पुन्हा पैदा झालेअसे विचार  माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले.    वणी येथील शासकीय मैदानावरून वणी शहराच्या मुख्य मार्गावरून स्वातंत्र्यवीर सावरकर एक गौरव यात्रा ढोलताशांच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या अतिषबाजीत शोषणाईच्या बग्गीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवून भव्य गौरव यात्रा काढण्यात आली. ही यात्रा लोकमान्य टिळक चौकाच्या सभामंडपात गौरव यात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले. “होय मी सावरकर” या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर हे होते प्रमुख वक्ते माजी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेना संपर्क प्रमुख विनोद मोहितकर,रवी बेलूरकर, दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लिशा विधाते, मंगला पावडे, संजय पिपलशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.   मान्यवरांचे हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सिंहगर्जना देऊन जयस्तुते जय स्तुते या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले प्रमुख वक्त्यांची परिचय संजय पिंपळशेंडे यांनी करून दिला  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले व माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी उपस्थितांना शपथ दिली कार्यक्रमाचे आभार रवी बेलूरकर यांनी मानले आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकाराने व सर्व भारतीय जनता पक्षाच्या व रा स्व संघाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News